राज्य कर्मचारी वेतन/थकबाकी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित
ZP Primary Teachers Salary: जिल्हा परिषदेमधील शिक्षकांचे माहे आक्टोंबर 2022 चे वेतन विहित मुदतीत न करणे त्याचप्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा गैरवापर करणे आणि शासनाची प्रतिमा मलिन करणे अशा इत्यादी मुद्द्यांबाबत खुलासा सादर करणे बाबत महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या मार्फत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना पाठविण्यात आलेले आहे. सदरचे परिपत्रक मध्ये सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षातील माहे आक्टोंबर 2022 पर्यंतचे महिन्याचे शिक्षकांचे वेतन अदा करणे साठी मूळ मंजूर तरतुदीच्या 70 टक्के तरतूद संचालना लय स्तरावरून १३७१०,०७,१४,०००/- (अक्षरी रक्कम तेरा हजार सातशे दहा कोटी सात लाख चौदा हजार फक्त) वितरित केलेली आहे परंतु राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे माही 2 ऑक्टोंबर 22 चे वेतन अद्याप पर्यंत झालेले नाही अनुदान पुरेशी देऊनही वेतन वेळेत झालेले नाही याबाबत महाराष्ट्र शासन तर्फे राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
परिपत्रकामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेतील शिक्षकाचे वेतन वेळेत का झाले नाही शिक्षक संघटनांना चुकीची कारणे सांगून संचालनालयाची व शासनाची प्रतिमा मलिक का केली आणि संदर्भीय अनुदान वितरण आदेशद्वारे केवळ शिक्षकांच्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध करून दिलेले असताना मुद्दा क्रमांक एक मध्ये नमूद करण्यात आलेले ध्येयके कोणत्या नियमानुसार आधार करण्यात आलेली आहे याचा खुलासा दिनांक 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह अध्यक्ष उपस्थित राहून अथवा खास दुतावा मार्फत संचालनालयास सादर करावा सदर खुलासा विहित मुदती त न पाठवल्यास आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम 1979 अन्वये पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!

No comments:
Post a Comment
Thanks For Comment