Maharashtra Police Bharti 2022 Update | राज्यात लवकरच 20 हजार जागेची पोलीस भरती

 राज्यात 20 हजार पोलीस भरती होणार - शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Police Bharti 2022 for 20,000 posts 

Maharashtra police bharti update 2022

Police Bharti 2022:   

               राज्यात ५२९७ उमेदवारांचे पोलीस प्रशिक्षण सुरु आहे,  तर सन २०२० मधील ७२३१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच मागणी करण्यात आलेल्या आणखी १० हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना गृहमंत्री यांनी दिल्या.

शिंदे-सरकारचा मोठा निर्णय :-    

 राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय तरुणांकरिता घेतला आहे. आज दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र माध्यमांना माहिती दिली की महाराष्ट्रात लवकरच 20 हजार पदांची पोलीस भरती घेण्यात येणार आहे.

 "एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी घेतलेला आहे. तो म्हणजे दोन वर्षांची पोलीस भरती आता आम्ही हाती घेत आहोत. साधारणपणे पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे." 

    असं वक्तव्य प्रसारमाध्यमाशी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

  • लक्षवेधी माहिती

👨🏽‍✈️👉🏼पोलीस भरती पेपर पॅटर्न समजण्यास मदत

👨🏽‍✈️👉🏼 अभ्यास कसा करावा समजेल

👨🏽‍✈️👉🏼 Practice Make Man Perfect

👨🏽‍✈️👉🏼 पोलीस भरती जुने पेपर  मिळावा मोफत

Maharashtra police bharti :-

     प्रसार माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले की पोलीस भरतीची सुरुवात आम्ही करत आहोत  सध्या साडेसात ते आठ हजार पदाची जाहिरात निघालेली आहे तसेच अजून 12 हजार जागे करता जाहिरात काढणार आहोत हे सुद्धा स्पष्ट केले.

येत्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती घेणार आहोत आणि या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलीस दलाला निश्चित फायदा होईल अशी माहिती महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

🗒️ आगामी पोलीस भरती 2022 करिता पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पीडीएफ PDF स्वरूपात मोफत डाउनलोड करा

          महाराष्ट्र पोलीस आयुक्त आणि लक्षात घेता राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत आहे त्या अनुषंगाने एकूण सात ते आठ  हजार जागेची पोलीस भरती ची जाहिरातीची आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच  आणखी बारा हजार पदांची पोलीस भरती घेण्याची तयारी सुरू आहे असे मत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केले.

सौजन्य - न्यूज नेटवर्क

Post a Comment

0 Comments

close