या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू GR

 दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत.

Old pension scheme latest news update 2024

Old pension scheme latest update Maharashtra:

संदर्भ क्र.१ येथील दि. ३१.१०.२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र शासनाने संदर्भ क्र. २ येथील दि. ०३.०३.२०२३ रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे, ज्याची जाहिरात/भरतीची/नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्कान योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच २२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि. ०१,०१,२००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२/२०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत (One Time Option) निर्णय घेतला आहे.

🌐शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

    सदर केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेची बाब विचाराधीन होती. याबाबत मा. मंत्रीमंडळाने दि. ०४ जानेवारी, २०२४ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती. याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.

शासन निर्णय :-

🌐शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

१. दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) देण्यात येत आहे.

२. संबंधित राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील. जे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी या ६ महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) लागू राहील. राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील.

३. जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकान्याकडे सादर करावा. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी हा जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत निर्गमित करावे, तसेच संबंधित राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) मधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे,

४. जे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे (GPF) खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) च्या खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कमव्याजासह जमा करण्यात यावी. जे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू..

सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी पीडीएफ येथे पहा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Scheme GR, #state employee GR, #state employee shasan nirnay, #पेन्शन शासन निर्णय, #राज्य कर्मचारी शासन निर्णय, #सरकारी कर्मचारी शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

500 Rupee Note viral news fake or real | भगवान राम मंदिर की तस्वीर के साथ ५००/ का नोट वायरल असली या झूठ?

 500 Rupee Note viral news fake or real | भगवान राम मंदिर की तस्वीर के साथ ५००/ का नोट वायरल सच या झूठ?

500 Rupee Note update:-

  अयोध्या में भव्य राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा की तमाम तैयारियां अंतिम दौर में है। तमाम तैयारियां अंतिम दौर में हैं। राम के अयोध्या को दुल्हन की तरह सजाया जा चुका है। जो अंतिम दौर की तैयारी है । वह भी लगातार जारी है । लेकिन अभी एक और खबर सोशल मीडिया में पूरी तेजी के साथ फैल रही है। जिसको लेकर हर कोई सवाल कर रहा है।  सवाल यह की क्या 22 जनवरी 2024 को RBI BANK द्वारा  भगवान श्री राम की तस्वीरें वाला ₹500 के नए सीरीज का नोट 22 जनवरी 2024 को लॉन्च होने वाला हैं। 

5000 fake note photo is available here you can see it below

Is your Rs 500 note real or fake? RBI suggests how to check

 अयोध्या में भगवान श्री राम के मंदिर का प्राण प्रतिष्ठा होने जा रहा है। तो सोशल मीडिया पर भगवान श्री राम और अयोध्या में बना रहे राम मंदिर की तस्वीरों के साथ ₹500 के नोट का फोटो लगातार वायरल हो रहा है।

 सोशल मीडिया पर भगवान श्री राम और अयोध्या में श्री राम मंदिर की तस्वीरों के साथ वाला ₹500 के नोट को देखें तो इस नोट में जहां राष्ट्रपिता महात्मा गांधी की तस्वीर है वहां भगवान श्री राम जी की तस्वीर है। और यह वायरल हो रहे। 

₹500 के नोट में भगवान श्री राम की तस्वीर है और नोट के पीछे जहां लाल किले की फोटो है वहां अयोध्या में तैयार हो रहे राम मंदिर की तस्वीर है।

  सोशल मीडिया पर भगवान श्री राम के फोटो के साथ ₹500 का नोट प्रिंट कर रहा है। इस ₹500 के नए सीरीज के नोट जारी किए जाने की कोई सूचना भारतीय रिज़र्व बैंक से ऐसी कोई सूचना सामने नहीं आई हैं। यह एक फेक न्यूज है।

Fact about 5000 rupees note | ₹500 Note To Feature Ram Mandir, Lord Ram? False Claims Go Viral

(बम लाइव वेबसाइट ने इस न्यूज़ का पर्दापाश किया है आप ऊपर दिए हुए लिंक पर जाकर चेक कर सकते हैं)

(Image- boom live website)

सूत्रों के मुताबिक भगवान श्री राम की तस्वीर के साथ वायरल हो रहा ₹500 का नोट है जिसका बैंकिंग सेक्टर की जानकारी का कहना है कि आरबीआई के तरफ से ऐसी कोई ना तो घोषणा की गई है । और ना जानकारी दी गई है।

   यह एक न्यूज़ है आरबीआई ऐसा कोई ₹500 के नए सीरीज का नोट जारी नहीं करने जा रहा है।

 ऐसा पहली भी हो चुका नहीं है। जब राष्ट्रपिता महात्मा गांधी की जगह किसी और के साथ ₹500 के नए सीरीज के नोट जारी किए जाने के बाद RBI BANK सामने आना पड़ा था।

 जून 2022 में यह बात का रिपोर्ट की जा रही थी कि आरबीआई 500 रुपए की नोट में महात्मा गांधी की तस्वीर को बदलकर रविंद्र नाथ टैगोर और मिसाइल मैन पूर्व राष्ट्रपति एपीजे कलाम की तस्वीर लगाने वाले है। तब आरबीआई को इस खबर का खंडन करने के लिए सामने आना पड़ा था । वैसे ही अब आरबीआई ने कहा था कि ऐसा कोई प्रस्ताव आरबीआई के सामने नहीं है।

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी


Pention Update status 2024| पेन्शन मध्ये सुधारणा करणे बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

 Pension : पेन्शन मध्ये सुधारणा करणे बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.16.01.2024

Old pension scheme latest news

Old pension scheme: 

     महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय सेवेतुन निवृत्त पेन्शनधारक यांचे संदर्भात दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय हा वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय हा दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागु करण्यात आलेला आहे .

वय वर्षे 80 वर्षे व त्यावरील राज्य शासकयी निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना 7 व्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनात वाढ हि दिनांक 01 जानेवारी 2019 पासून सुधारित करण्यात आलेली आहे .

राज्य कर्मचारी शासन निर्णय

 सदर शासन निर्णयानुसार असा आदेश देण्यात येत आहेत की , दिनांक 01 जानेवारी 2024 पासून निवृत्तीवेतनधारकांचे वय व त्यांच्या मुळ निवृत्तीवेतनांमध्ये करण्यात आलेली सुधारित वाढ पुढीलप्रमाणे आहे .

👉🌐शासन निर्णय येथे पहा 👈✅

  • वय वर्षे ८० ते ८५ - मूळ निवृत्तिवेतनात २०% वाढ
  • वय वर्षे ८५ पेक्षा अधिक ते ९०-  मूळ निवृत्तिवेतनात ३०% वाढ

  • वय वर्षे ९० पेक्षा अधिक ते ९५ - मूळ निवृत्तिवेतनात ४०% वाढ

  • वय वर्षे ९५ पेक्षा अधिक ते१००-  मूळ निवृत्तिवेतनात ५०% वाढ

  • वय वर्षे १०० पेक्षा अधिक - मूळ निवृत्तिवेतनात १००% वाढ

२. सदर लाभ केवळ दि.०१.०१.२०२४ पासून देय राहील. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही.


3. या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तिवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तिवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / कोषागार अधिकारी यांची राहील.


४. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे, यांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील.

state employee shasan nirnay

4. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहतील.

६. यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तिवेतनधारकांची निवृत्तिवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.


19. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४०११६१६१६२०७५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

#Pension


Scheme GR, #state employee GR, #state employee shasan nirnay, #पेन्शन शासन निर्णय, #राज्य कर्मचारी शासन निर्णय, #सरकारी कर्मचारी शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Rashtriya Vayoshri Yojana 2024 | ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना 2024

आज रोजीचे शासन निर्णय - योजना - उपक्रम पुढील प्रमाणे:-

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना 

    आजच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसरच्या आजी- आजोबा उद्यानाला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांसमवेत संवाद साधला. आपला आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे असे सांगून ज्येष्ठ नागरिकांकडून सदैव ऊर्जा व प्रेरणा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Rashtriya Vayoshri Yojana 2024,

 RVY Yojana 2024 latest update:

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन अनेक योजना राबवित असून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ सुरू करण्यात येत आहे, लवकरच या योजनेचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
  • दहिसर येथील आजी-आजोबा उद्यानास भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महापालिकेने त्यांच्या रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था सुरू करावी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

मुख्यमंत्री वयोश्री योजना pdf येथे पहा.

  • राष्ट्रीय वायोश्री योजना (RVY) ही BPL श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक-जीवन उपकरणे प्रदान करण्याची योजना आहे. 
  • ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे, जी पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे अनुदानित आहे. 
  • योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा खर्च "ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी" मधून केला जाईल. ही योजना सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या एकमात्र अंमलबजावणी एजन्सी - आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (ALIMCO) मार्फत राबविण्यात येईल .

60 वर्षांहून अधिक आहे त्यांना मिळणार मोफत साधने:- 

या योजनेंतर्गत, भौतिक सहाय्य फक्त देशातील ज्येष्ठ नागरिकांनाच दिले जाईल. याचा अर्थ असा होतो की ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे त्यांना मोफत सहाय्यक राहणीमान आणि भौतिक उपकरणे मिळतील जी त्यांच्या टिकावासाठी आवश्यक आहेत. तसेच सरकार योजना राबविल्या जाणार्‍या शहरांची यादी निवडली आहे. ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) योजनेचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी मुख्य निकष म्हणजे ते BPL कुटुंबातील असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे संबंधित प्राधिकरणाने जारी केलेले वैध BPL कार्ड असावे.

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) पात्रता:

  • ज्येष्ठ नागरिक, बीपीएल श्रेणीतील आणि वयाशी संबंधित कोणत्याही अपंगत्व/अशक्तपणाने ग्रस्त आहेत. 
  • कमी दृष्टी, श्रवणदोष, दात गळणे आणि लोकोमोटर अपंगत्व अशा सहाय्यक-जीवित उपकरणांसह प्रदान केले जातील जे प्रकट झालेल्या अपंगत्व/अशक्तपणावर मात करून, त्यांच्या शारीरिक कार्यांमध्ये सामान्यता आणू शकतील. 
  • या योजनेचा लाभ देशभरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे.

समर्थित उपकरणे कोणती आहेत:

  • चालण्याची काठी
  • कोपर क्रचेस
  • वॉकर / क्रॅचेस
  • ट्रायपॉड्स/क्वाडपॉड्स
  • श्रवणयंत्र
  • व्हीलचेअर
  • कृत्रिम दात
  • चष्मा

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY)  योजनेची ठळक वैशिष्ट्ये:-

  • पात्र ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रकट होणाऱ्या अपंगत्व/अशक्तपणाच्या मर्यादेनुसार उपकरणांचे मोफत वितरण.
  • एकाच व्यक्तीमध्ये अनेक अपंगत्व/अशक्तता दिसून आल्यास, प्रत्येक अपंगत्व/अशक्तपणाच्या संदर्भात सहाय्यक उपकरणे दिली जातील.
  • आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (ALIMCO) मदत आणि सहाय्यक जिवंत उपकरणांची एक वर्ष मोफत देखभाल करेल.
  • उपायुक्त/जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची ओळख राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे केली जाईल.
  • शक्यतो, प्रत्येक जिल्ह्यातील 30% लाभार्थी महिला असतील.
  • राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन/जिल्हास्तरीय समिती NSAP किंवा राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन प्राप्त करणार्‍या बीपीएल लाभार्थींचा डेटा बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखीसाठी वापरू शकते.
  • उपकरणे कॅम्प मोडमध्ये वितरित केली जातील.


समाविष्ट जिल्हे

     सध्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 325 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी मूल्यांकन शिबिरे 135 जिल्ह्यांमध्ये पूर्ण झाली आहेत (25.01.2019 पर्यंत), 77 वितरण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत ज्याचा लाभ BPL श्रेणीतील 70939 ज्येष्ठ नागरिकांना झाला आहे.

राष्ट्रीय वायोश्री योजनेंतर्गत (25/01/2019 रोजी) लाभ झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची राज्यवार/वर्षनिहाय एकूण संख्या या लिंकवर उपलब्ध आहे .


संबंधित दुवे

Rashtriya Vayoshri Yojana in Marathi

तसेच इतर उपक्रम आणि योजना पुढीलप्रमाणे:-

*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दहिसर, मालाड, कांदिवलीमध्ये पार पडले सखोल स्वच्छता अभियान*

---------------

*मुंबईमध्ये ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*


मुंबई दि. १४ :-   ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाप्रमाणे मुंबईमध्ये ‘आरोग्य आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी भेट देऊन ही मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दहिसर येथे आयोजित सखोल स्वच्छता मोहिमेप्रसंगी ते बोलत होते. 

सखोल स्वच्छता मोहिमेंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव वल्लभ छेद रस्ता, आजोबा-आजी उद्यान, नॅन्सी  कॉलनी, सावरकर नगर, दहिसर पूर्व, सिंह इस्टेट मार्ग क्र. ०२ ठाकूर गाव, कांदिवली पूर्व, दफ्तरी मार्ग, मालाड पूर्व, तपोवन मालाड पूर्व येथे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 

या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सिद्धेश कदम यांनी वडारपाडा, कांदिवली पूर्व येथे आयोजित केलेल्या महा आरोग्य शिबिराला भेट दिली. तदनंतर बुवा साळवी मैदान, दिंडोशी येथील  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासमवेत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार अतुल भातखळकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.


*स्वच्छता मोहीम व्यापक लोकचळवळ*


स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र असून स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात, घरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारूया, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.


मुंबईत राबविण्यात येत असलेल्या या स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक, सामजिक संस्था, मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे. स्वच्छता मोहीम आता व्यापक लोक चळवळ बनली आहे असे गौरवोद्गार  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले. लोकांनी हातात घेतलेली स्वच्छतेचे अभियान लोक चळवळ बनून यशस्वी होत आहे. या अभियानात यापुढे  सातत्य ठेवून प्रत्येकाने यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 


देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. त्याचे महत्त्व आता सर्वांना कळत आहे. ही चळवळ फक्त सरकारची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे. स्वच्छता अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छ सर्वेक्षणाचा पहिला पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


*स्वच्छता अभियानामुळे प्रदूषणात घट*

मुंबईत राबविण्यात येत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे  प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषणाची पातळी ३०० वरून १०० पर्यंत खाली आली आहे, हे या अभियानाचे यश म्हणावे लागेल. याचे सारे श्रेय मुंबईच्या सफाई कामगारांना आणि या अभियानात सहभागी होत असलेल्या मुंबईकरांचे आहे. स्वच्छ्ता अभियान सतत चालणारे अभियान आहे. यापुढे या अभियानात सातत्य ठेवण्यात येईल आणि मुंबईत ‘अर्बन फॉरेस्ट’ संकल्पना  राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. 


*कांदिवली येथे मुख्यमंत्र्यांचा शिक्षक व जनतेशी संवाद*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉलेज समोरील सिंग इस्टेट रोड नं. २ ची पाहणी करून उपस्थित शिक्षक व जनतेची संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. स्वच्छता हा आरोग्याचा मुलमंत्र घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या परिसरातील लोकांच्या घरासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांसंदर्भात  आनंद महिंद्रा यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रश्नातून मार्ग काढला जाईल. वन विभागाकडील प्रश्नांबद्दल वनविभागाच्या सचिवांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे  सांगून  शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 


*महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन*

सिद्धेश कदम यांनी वडारपाडा कांदिवली येथील हनुमान मंदिर येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन या शिबिराचे उद्घाटन केले. या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून संयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले. 


*मुंबईत २५०  आपला दवाखाने सुरू करणार*

दिंडोशी येथील बुवा साळवी मैदान परिसरात सुरू करण्यात आलेल्या  हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर त्यांनी या दवाखान्यातील नोंदणी कक्ष, चिकित्सा कक्ष, औषध निर्माता कक्ष, नर्सिंग रूम या  ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार असून आतापर्यंत २०२ दवाखाने सुरू झाले आहेत. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लघु अग्निशमन केंद्राचे उद्घाटन आणि शारदाबाई गोविंद पवार गार्डनचे भूमिपूजन करण्यात आले.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

या शासकीय कर्मचारी यांना ५००० रुपये अदा करणे बाबत शासन निर्णय निर्गमित | state employee GR

 या  शासकीय कर्मचारी यांना ५००० रुपये अदा करणे बाबत शासन निर्णय निर्गमित | state employee GR

#SHASAN NIRNAY 2024, #state employee, #state employee GR, #राज्य कर्मचारी शासन निर्णय, #वैद्यकीय तपासणी GR, #शासन निर्णय, #सुधारीत शासन निर्णय वैद्यकीय तपासणी GR, शासन निर्णय, सुधारीत शासन निर्णय

  वय वर्षे ४० ते ५० वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

राज्य कर्मचारी शासन निर्णय:-

    महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी जे 40 ते 50 या वयोगटातील आहेत. प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे.

  • राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शासकीय सेवेत कार्यरत असणारे वय वर्षे चाळीस ते पन्नास या वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांना ०२ दोन वर्षातून एकदा व वय वर्ष 51 व त्यावरील वयोगटातल  शासकीय अधिकारी कर्मचारी यांना वैद्यकीय तपासणी अनुदनीय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणी करता (५०००/-) पाच हजार रुपये प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिकृती अदा करणे बाबत शासनाने मान्यता दिली आहे.
  • राज्य शासकीय अधिकारी युवा कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धरण या शासन शुद्धिपत्रक परिपत्रकानुसार करण्यात आलेले आहे.
   शासन शुद्धीपत्रक:- 
      वर्षे ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष 51 व त्यावरील वयोगटातील सर्वात अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञ असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणी करता रुपये पाच हजार रुपये याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिकृती गृही भागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासन निर्णयान्वये अपवादात्मक बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासकीय निर्णय दिनांक 8 डिसेंबर 2022 च्या प्रपत्र येथे नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
   सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यकता असल्यास विहित कार्यपद्धती निश्चित करण्याची कारवाई गृह विभागामार्फत करण्यात यावी तसेच उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयातील सर्व बाबी लागू राहतील.
 #SHASAN NIRNAY 2024, #state employee, #state employee GR, #राज्य कर्मचारी शासन निर्णय, #वैद्यकीय तपासणी GR, #शासन निर्णय, #सुधारीत शासन निर्णय
 शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Free Government Scheme 2024 | सरकारच्या या “तीन” योजनांमधून मिळतात पैसे! फक्त आधार कार्ड लागते

सरकारच्या या  योजनांमधून मिळतात पैसे! लगेच अर्ज करा! वाचा सविस्तर माहिती... Free Sarakari Yojana 2024

Sarakari Yojana 2024:

         सरकारच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये काही योजना या व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत करतात. तर काही कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत.

      परंतु सरकारच्या अशा काही योजना देखील आहेत ज्यामधून आपल्याला पैसे मिळू शकतात. तसे पाहायला गेले तर सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. परंतु बऱ्याचदा आपल्याला पुरेशा योजनांची माहिती होत नाही व काही मोजक्या योजना आपल्याला माहिती असतात.

free silai machine yojana 2024,gujarat sarkari yojana 2024,pm awas yojana 2024,sarkari yojana,pradhan mantri awas yojana 2024,madhya pradesh sarkari yojana 2024,awas yojana new list 2024,ujjwala yojana 2024 free gas cylinder,pm ujjwala yojana free gas,pm awas yojana new list 2024,awas yojana new update 2024,pm awas yojana new update 2024,pm awas yojana 2023,sarkari yojana 2024,pm awas plus yojana new update 2024,mp sarkari yojana 2024

Sarakari Yojana 2024 सरकारच्या महत्त्वाच्या योजना

1) स्किल इंडिया योजना किंवा प्रधानमंत्री कौशल विकास योजना (Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 2024) :- 

      आपण बेरोजगार आहात काय?  तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोकरी वगैरे नाही तर तुमच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरू शकते व या योजनेचे माध्यमातून तुम्हाला अनेक नवनवीन कौशल्य (business idea) शिकायची संधी मिळते.

  • तुम्ही जर आर्थिक दृष्ट्या पुरेसे स्थिर नसेल तर नवीन कौशल्य शिकण्यासाठी संस्थेत किंवा कोचिंग सेंटर मध्ये दाखल होण्याकरिता महत्वाची अशी ही योजना असून या योजनेच्या माध्यमातून सरकार मोफत कौशल्य प्रशिक्षण देते. 
  • या योजनेच्या माध्यमातून 03 महिने ते 06 महिन्यांपर्यंतचे कोर्सेस तुम्हाला शिकायला मिळतात आणि या कोर्सचे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व कोर्स तुम्हाला नोकरीसाठी खूप मदत करतात.
  • किंवा या कोर्सेस मधून तुम्ही नवनवीन कौशल्य शिकून एखादा चांगला व्यवसायाची निवड करून व्यवसाय देखील करता येतो.
  • जर आपण या योजनेच्या माध्यमातून शिकवले जाणारे कोर्सेसचा विचार केला तर यामध्ये डिजिटल मार्केटिंग, मेकअप आर्टिस्ट तसेच प्रोग्रामिंग, ग्राफिक डिझायनिंग तसेच संगणक प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाते.
  • या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, अन्न प्रक्रिया, फर्निचर आणि फिटिंग्ज, हस्तकला, ​​रत्ने आणि दागिने आणि चामड्याचे तंत्रज्ञान अशा सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल.
  • विशेष म्हणजे हे सर्व कोर्स तुम्हाला कुठल्याही पैशांशिवाय शिकता येतात.
  •  महत्वाचे म्हणजे हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकार प्रमाणपत्र देते व त्यासोबत 05 ते 10 हजार रुपये देखील देते. 
  • या माध्यमातून तुम्हाला प्लेसमेंटची सुविधा देखील दिली जाते. जे सरकारने काही कंपन्यांशी करार केला असून हे कौशल्य प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या कौशल्यानुसार या कंपन्यांमध्ये नोकरी देखील मिळते.
  • देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. 
  •  केंद्र सरकारने अलीकडेच कौशल्य विकास योजना (Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  •     हे प्रशिक्षण नागरिकांना मोफत दिले जाणार आहे.
  •  इच्छुक लाभार्थी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkvyofficial.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 
  • या लेखाद्वारे तुम्हाला प्रधानमंत्री कौशल विकास योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली जाईल.
  •  याशिवाय, तुम्हाला प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली जाईल.

PMKVY पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची माहिती

योजनेचे नाव 

PM Kaushal Vikas Yojana

कोणी सुरू केली 

  केंद्र सरकार

लाभार्थी

देशातील बेरोजगार तरुण

उद्देश्य

देशातील तरुणांना विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणे

अधिकृत संकेतस्थळ

http://pmkvyofficial.org/Index.aspx

PM Kaushal Vikas Yojana Eligibility Criteria 

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024 साठी पात्रता काय लागते? 

  • unchecked

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

  • unchecked

    ही योजना केवळ अशा लोकांसाठी आहे जे बेरोजगार आहेत आणि ज्यांचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.

  • unchecked

    कॉलेज/शालेय गळती - अर्जदाराला हिंदी आणि इंग्रजी भाषांचे मूलभूत ज्ञान असावे.

  • unchecked

    10वी किंवा 12वी नंतर शिक्षण सोडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून एकाच ठिकाणी कौशल्य प्रदान केले जाईल.


PM Kaushal Vikas Yojana Required Documents | पीएम कौशल्य विकास योजना


  • unchecked

    योजना 2024 ची कागदपत्रे 

  • unchecked

    अर्जदाराचे आधार कार्ड

  • unchecked

    ओळखपत्र

  • unchecked

    मतदार ओळखपत्र

  • unchecked

    बँक खाते पासबुक

  • unchecked

    मोबाईल नंबर

  • unchecked

    पासपोर्ट आकाराचा फोटो

जर आपण आवेदन अर्ज करण्यास एछुक असाल तर खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपला आवेदन अर्ज सदर करा. 


ई श्रम कार्ड योजना 

      ई-श्रम योजनेंतर्गत कामगार वर्गातील कामगारांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. ई-श्रम योजना सुरू करण्यामागचा उद्देश असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा होता जेणेकरून त्यांचे जीवन सुरळीत चालेल. जर तुम्ही देखील मजूर वर्गातील असाल आणि तुम्हाला अजून 1000 रुपये मिळाले नाहीत, तर हा लेख महत्त्वाचा ठरतो.

  •     ई श्रम कार्ड योजना योग्य प्रकारे राबवता यावी याकरिता सरकारने ई श्रम पोर्टल देखील सुरू केले आहे. 
  • या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी नोंदणी केली असून यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. 
  • उपलब्ध आकडेवारीनुसार या पोर्टलच्या माध्यमातून 15% महिला व 47 टक्के पुरुषांनी नोंदणी केलेली आहे. 
  • या योजनेच्या माध्यमातून ई श्रम कार्ड बनवलेल्या कामगारांना केंद्राने राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते. 
  • या योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांना वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शनची रक्कम मिळते व एवढेच नाही तर नोंदणीकृत कामगाराला 02  लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा संरक्षण देखील या माध्यमातून मिळते. 
  • एखादा कामगार जर अपंग झाला तर त्याला 01  लाख रुपये दिले जातात.

तसेच या अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना घर बांधण्याकरिता निधी दिला जातो. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या कामगारांना त्यांच्या कामानुसार लागणारी उपकरणे देखील दिली जातात. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या श्रमयोगी मानधन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना इत्यादी योजनांचा देखील लाभ दिला जातो.

uncheckedअधिकृत वेबसाईट

पीएम सुरक्षा विमा योजना

ही योजना गरीब लोकांसाठी खूप महत्त्वाचे असून योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला वर्षाला फक्त 12 रुपये यामध्ये गुंतवावे लागतात. त्यानंतर मात्र तुम्ही दोन लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी पात्र होता. तसेच या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक फायदे देखील अर्जदाराला मिळत असतात.

  • पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर जर एखाद्याचा गंभीर अपघात किंवा अपघातात मृत्यू झाला तर या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील मिळते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर वर्षाला फक्त बारा रुपये यामध्ये तुम्हाला जमा करावे लागतात.
  • 18 ते 70 वर्षाच्या वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याचा अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आले तर विमाधारकाला दोन लाख रुपये देण्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे.

अंशत: अपंगत्व आले असेल तर एक लाख रुपयांची रक्कम या माध्यमातून मिळते. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बचत खात्याचा तपशील देणे गरजेचे असते व त्या नंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून एक रुपये प्रीमियम कापला जातो.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇

व्हाट्सअप ग्रुप येथे जॉईन करा


काही महत्त्वाच्या लिंक्स:

काही महत्त्वाच्या लिंक्स

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी