Rashtriya Vayoshri Yojana 2024 | ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना 2024

आज रोजीचे शासन निर्णय - योजना - उपक्रम पुढील प्रमाणे:-

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना 

    आजच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसरच्या आजी- आजोबा उद्यानाला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांसमवेत संवाद साधला. आपला आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे असे सांगून ज्येष्ठ नागरिकांकडून सदैव ऊर्जा व प्रेरणा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Rashtriya Vayoshri Yojana 2024,

 RVY Yojana 2024 latest update:

 • ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन अनेक योजना राबवित असून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ सुरू करण्यात येत आहे, लवकरच या योजनेचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
 • दहिसर येथील आजी-आजोबा उद्यानास भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महापालिकेने त्यांच्या रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था सुरू करावी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

मुख्यमंत्री वयोश्री योजना pdf येथे पहा.

 • राष्ट्रीय वायोश्री योजना (RVY) ही BPL श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक-जीवन उपकरणे प्रदान करण्याची योजना आहे. 
 • ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे, जी पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे अनुदानित आहे. 
 • योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा खर्च "ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी" मधून केला जाईल. ही योजना सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या एकमात्र अंमलबजावणी एजन्सी - आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (ALIMCO) मार्फत राबविण्यात येईल .

60 वर्षांहून अधिक आहे त्यांना मिळणार मोफत साधने:- 

या योजनेंतर्गत, भौतिक सहाय्य फक्त देशातील ज्येष्ठ नागरिकांनाच दिले जाईल. याचा अर्थ असा होतो की ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे त्यांना मोफत सहाय्यक राहणीमान आणि भौतिक उपकरणे मिळतील जी त्यांच्या टिकावासाठी आवश्यक आहेत. तसेच सरकार योजना राबविल्या जाणार्‍या शहरांची यादी निवडली आहे. ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) योजनेचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी मुख्य निकष म्हणजे ते BPL कुटुंबातील असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे संबंधित प्राधिकरणाने जारी केलेले वैध BPL कार्ड असावे.

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) पात्रता:

 • ज्येष्ठ नागरिक, बीपीएल श्रेणीतील आणि वयाशी संबंधित कोणत्याही अपंगत्व/अशक्तपणाने ग्रस्त आहेत. 
 • कमी दृष्टी, श्रवणदोष, दात गळणे आणि लोकोमोटर अपंगत्व अशा सहाय्यक-जीवित उपकरणांसह प्रदान केले जातील जे प्रकट झालेल्या अपंगत्व/अशक्तपणावर मात करून, त्यांच्या शारीरिक कार्यांमध्ये सामान्यता आणू शकतील. 
 • या योजनेचा लाभ देशभरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे.

समर्थित उपकरणे कोणती आहेत:

 • चालण्याची काठी
 • कोपर क्रचेस
 • वॉकर / क्रॅचेस
 • ट्रायपॉड्स/क्वाडपॉड्स
 • श्रवणयंत्र
 • व्हीलचेअर
 • कृत्रिम दात
 • चष्मा

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY)  योजनेची ठळक वैशिष्ट्ये:-

 • पात्र ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रकट होणाऱ्या अपंगत्व/अशक्तपणाच्या मर्यादेनुसार उपकरणांचे मोफत वितरण.
 • एकाच व्यक्तीमध्ये अनेक अपंगत्व/अशक्तता दिसून आल्यास, प्रत्येक अपंगत्व/अशक्तपणाच्या संदर्भात सहाय्यक उपकरणे दिली जातील.
 • आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (ALIMCO) मदत आणि सहाय्यक जिवंत उपकरणांची एक वर्ष मोफत देखभाल करेल.
 • उपायुक्त/जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची ओळख राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे केली जाईल.
 • शक्यतो, प्रत्येक जिल्ह्यातील 30% लाभार्थी महिला असतील.
 • राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन/जिल्हास्तरीय समिती NSAP किंवा राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन प्राप्त करणार्‍या बीपीएल लाभार्थींचा डेटा बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखीसाठी वापरू शकते.
 • उपकरणे कॅम्प मोडमध्ये वितरित केली जातील.


समाविष्ट जिल्हे

     सध्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 325 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी मूल्यांकन शिबिरे 135 जिल्ह्यांमध्ये पूर्ण झाली आहेत (25.01.2019 पर्यंत), 77 वितरण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत ज्याचा लाभ BPL श्रेणीतील 70939 ज्येष्ठ नागरिकांना झाला आहे.

राष्ट्रीय वायोश्री योजनेंतर्गत (25/01/2019 रोजी) लाभ झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची राज्यवार/वर्षनिहाय एकूण संख्या या लिंकवर उपलब्ध आहे .


संबंधित दुवे

Rashtriya Vayoshri Yojana in Marathi

तसेच इतर उपक्रम आणि योजना पुढीलप्रमाणे:-

*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दहिसर, मालाड, कांदिवलीमध्ये पार पडले सखोल स्वच्छता अभियान*

---------------

*मुंबईमध्ये ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*


मुंबई दि. १४ :-   ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाप्रमाणे मुंबईमध्ये ‘आरोग्य आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी भेट देऊन ही मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दहिसर येथे आयोजित सखोल स्वच्छता मोहिमेप्रसंगी ते बोलत होते. 

सखोल स्वच्छता मोहिमेंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव वल्लभ छेद रस्ता, आजोबा-आजी उद्यान, नॅन्सी  कॉलनी, सावरकर नगर, दहिसर पूर्व, सिंह इस्टेट मार्ग क्र. ०२ ठाकूर गाव, कांदिवली पूर्व, दफ्तरी मार्ग, मालाड पूर्व, तपोवन मालाड पूर्व येथे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 

या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सिद्धेश कदम यांनी वडारपाडा, कांदिवली पूर्व येथे आयोजित केलेल्या महा आरोग्य शिबिराला भेट दिली. तदनंतर बुवा साळवी मैदान, दिंडोशी येथील  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासमवेत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार अतुल भातखळकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.


*स्वच्छता मोहीम व्यापक लोकचळवळ*


स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र असून स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात, घरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारूया, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.


मुंबईत राबविण्यात येत असलेल्या या स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक, सामजिक संस्था, मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे. स्वच्छता मोहीम आता व्यापक लोक चळवळ बनली आहे असे गौरवोद्गार  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले. लोकांनी हातात घेतलेली स्वच्छतेचे अभियान लोक चळवळ बनून यशस्वी होत आहे. या अभियानात यापुढे  सातत्य ठेवून प्रत्येकाने यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 


देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. त्याचे महत्त्व आता सर्वांना कळत आहे. ही चळवळ फक्त सरकारची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे. स्वच्छता अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छ सर्वेक्षणाचा पहिला पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


*स्वच्छता अभियानामुळे प्रदूषणात घट*

मुंबईत राबविण्यात येत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे  प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषणाची पातळी ३०० वरून १०० पर्यंत खाली आली आहे, हे या अभियानाचे यश म्हणावे लागेल. याचे सारे श्रेय मुंबईच्या सफाई कामगारांना आणि या अभियानात सहभागी होत असलेल्या मुंबईकरांचे आहे. स्वच्छ्ता अभियान सतत चालणारे अभियान आहे. यापुढे या अभियानात सातत्य ठेवण्यात येईल आणि मुंबईत ‘अर्बन फॉरेस्ट’ संकल्पना  राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. 


*कांदिवली येथे मुख्यमंत्र्यांचा शिक्षक व जनतेशी संवाद*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉलेज समोरील सिंग इस्टेट रोड नं. २ ची पाहणी करून उपस्थित शिक्षक व जनतेची संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. स्वच्छता हा आरोग्याचा मुलमंत्र घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या परिसरातील लोकांच्या घरासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांसंदर्भात  आनंद महिंद्रा यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रश्नातून मार्ग काढला जाईल. वन विभागाकडील प्रश्नांबद्दल वनविभागाच्या सचिवांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे  सांगून  शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 


*महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन*

सिद्धेश कदम यांनी वडारपाडा कांदिवली येथील हनुमान मंदिर येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन या शिबिराचे उद्घाटन केले. या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून संयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले. 


*मुंबईत २५०  आपला दवाखाने सुरू करणार*

दिंडोशी येथील बुवा साळवी मैदान परिसरात सुरू करण्यात आलेल्या  हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर त्यांनी या दवाखान्यातील नोंदणी कक्ष, चिकित्सा कक्ष, औषध निर्माता कक्ष, नर्सिंग रूम या  ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार असून आतापर्यंत २०२ दवाखाने सुरू झाले आहेत. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लघु अग्निशमन केंद्राचे उद्घाटन आणि शारदाबाई गोविंद पवार गार्डनचे भूमिपूजन करण्यात आले.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Post a Comment

0 Comments

close