सरकारच्या या योजनांमधून मिळतात पैसे! लगेच अर्ज करा! वाचा सविस्तर माहिती... Free Sarakari Yojana 2024
Sarakari Yojana 2024:
सरकारच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये काही योजना या व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत करतात. तर काही कृषी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत.
परंतु सरकारच्या अशा काही योजना देखील आहेत ज्यामधून आपल्याला पैसे मिळू शकतात. तसे पाहायला गेले तर सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. परंतु बऱ्याचदा आपल्याला पुरेशा योजनांची माहिती होत नाही व काही मोजक्या योजना आपल्याला माहिती असतात.
Sarakari Yojana 2024 सरकारच्या महत्त्वाच्या योजना
1) स्किल इंडिया योजना किंवा प्रधानमंत्री कौशल विकास योजना (Pradhanmantri Kaushal Vikas Yojana 2024) :-
आपण बेरोजगार आहात काय? तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोकरी वगैरे नाही तर तुमच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरू शकते व या योजनेचे माध्यमातून तुम्हाला अनेक नवनवीन कौशल्य (business idea) शिकायची संधी मिळते.
- तुम्ही जर आर्थिक दृष्ट्या पुरेसे स्थिर नसेल तर नवीन कौशल्य शिकण्यासाठी संस्थेत किंवा कोचिंग सेंटर मध्ये दाखल होण्याकरिता महत्वाची अशी ही योजना असून या योजनेच्या माध्यमातून सरकार मोफत कौशल्य प्रशिक्षण देते.
- या योजनेच्या माध्यमातून 03 महिने ते 06 महिन्यांपर्यंतचे कोर्सेस तुम्हाला शिकायला मिळतात आणि या कोर्सचे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व कोर्स तुम्हाला नोकरीसाठी खूप मदत करतात.
- किंवा या कोर्सेस मधून तुम्ही नवनवीन कौशल्य शिकून एखादा चांगला व्यवसायाची निवड करून व्यवसाय देखील करता येतो.
- जर आपण या योजनेच्या माध्यमातून शिकवले जाणारे कोर्सेसचा विचार केला तर यामध्ये डिजिटल मार्केटिंग, मेकअप आर्टिस्ट तसेच प्रोग्रामिंग, ग्राफिक डिझायनिंग तसेच संगणक प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाते.
- या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, अन्न प्रक्रिया, फर्निचर आणि फिटिंग्ज, हस्तकला, रत्ने आणि दागिने आणि चामड्याचे तंत्रज्ञान अशा सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल.
- विशेष म्हणजे हे सर्व कोर्स तुम्हाला कुठल्याही पैशांशिवाय शिकता येतात.
- महत्वाचे म्हणजे हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकार प्रमाणपत्र देते व त्यासोबत 05 ते 10 हजार रुपये देखील देते.
- या माध्यमातून तुम्हाला प्लेसमेंटची सुविधा देखील दिली जाते. जे सरकारने काही कंपन्यांशी करार केला असून हे कौशल्य प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या कौशल्यानुसार या कंपन्यांमध्ये नोकरी देखील मिळते.
- देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
- केंद्र सरकारने अलीकडेच कौशल्य विकास योजना (Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- हे प्रशिक्षण नागरिकांना मोफत दिले जाणार आहे.
- इच्छुक लाभार्थी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkvyofficial.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- या लेखाद्वारे तुम्हाला प्रधानमंत्री कौशल विकास योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली जाईल.
- याशिवाय, तुम्हाला प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली जाईल.
PMKVY पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची माहिती
PM Kaushal Vikas Yojana Eligibility Criteria
प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2024 साठी पात्रता काय लागते?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
ही योजना केवळ अशा लोकांसाठी आहे जे बेरोजगार आहेत आणि ज्यांचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.
कॉलेज/शालेय गळती - अर्जदाराला हिंदी आणि इंग्रजी भाषांचे मूलभूत ज्ञान असावे.
10वी किंवा 12वी नंतर शिक्षण सोडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून एकाच ठिकाणी कौशल्य प्रदान केले जाईल.
PM Kaushal Vikas Yojana Required Documents | पीएम कौशल्य विकास योजना
योजना 2024 ची कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
ओळखपत्र
मतदार ओळखपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
जर आपण आवेदन अर्ज करण्यास एछुक असाल तर खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपला आवेदन अर्ज सदर करा.
ई श्रम कार्ड योजना
ई-श्रम योजनेंतर्गत कामगार वर्गातील कामगारांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. ई-श्रम योजना सुरू करण्यामागचा उद्देश असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा होता जेणेकरून त्यांचे जीवन सुरळीत चालेल. जर तुम्ही देखील मजूर वर्गातील असाल आणि तुम्हाला अजून 1000 रुपये मिळाले नाहीत, तर हा लेख महत्त्वाचा ठरतो.
- ई श्रम कार्ड योजना योग्य प्रकारे राबवता यावी याकरिता सरकारने ई श्रम पोर्टल देखील सुरू केले आहे.
- या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी नोंदणी केली असून यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे.
- उपलब्ध आकडेवारीनुसार या पोर्टलच्या माध्यमातून 15% महिला व 47 टक्के पुरुषांनी नोंदणी केलेली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ई श्रम कार्ड बनवलेल्या कामगारांना केंद्राने राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते.
- या योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांना वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शनची रक्कम मिळते व एवढेच नाही तर नोंदणीकृत कामगाराला 02 लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा संरक्षण देखील या माध्यमातून मिळते.
- एखादा कामगार जर अपंग झाला तर त्याला 01 लाख रुपये दिले जातात.
तसेच या अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना घर बांधण्याकरिता निधी दिला जातो. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या कामगारांना त्यांच्या कामानुसार लागणारी उपकरणे देखील दिली जातात. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या श्रमयोगी मानधन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना इत्यादी योजनांचा देखील लाभ दिला जातो.
पीएम सुरक्षा विमा योजना
ही योजना गरीब लोकांसाठी खूप महत्त्वाचे असून योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला वर्षाला फक्त 12 रुपये यामध्ये गुंतवावे लागतात. त्यानंतर मात्र तुम्ही दोन लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी पात्र होता. तसेच या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक फायदे देखील अर्जदाराला मिळत असतात.
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर जर एखाद्याचा गंभीर अपघात किंवा अपघातात मृत्यू झाला तर या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील मिळते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर वर्षाला फक्त बारा रुपये यामध्ये तुम्हाला जमा करावे लागतात.
- 18 ते 70 वर्षाच्या वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याचा अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आले तर विमाधारकाला दोन लाख रुपये देण्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे.
अंशत: अपंगत्व आले असेल तर एक लाख रुपयांची रक्कम या माध्यमातून मिळते. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बचत खात्याचा तपशील देणे गरजेचे असते व त्या नंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून एक रुपये प्रीमियम कापला जातो.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
- व्हाट्सअप ग्रुप येथे जॉईन करा
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
काही महत्त्वाच्या लिंक्स
- Educational Notes
- 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार अर्ज सुरू | Vidyadhan Scholarship 2024
0 Comments
Thanks For Comment