Pention Update status 2024| पेन्शन मध्ये सुधारणा करणे बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

 Pension : पेन्शन मध्ये सुधारणा करणे बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.16.01.2024

Old pension scheme latest news

Old pension scheme: 

     महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय सेवेतुन निवृत्त पेन्शनधारक यांचे संदर्भात दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय हा वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय हा दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागु करण्यात आलेला आहे .

वय वर्षे 80 वर्षे व त्यावरील राज्य शासकयी निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना 7 व्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनात वाढ हि दिनांक 01 जानेवारी 2019 पासून सुधारित करण्यात आलेली आहे .

राज्य कर्मचारी शासन निर्णय

 सदर शासन निर्णयानुसार असा आदेश देण्यात येत आहेत की , दिनांक 01 जानेवारी 2024 पासून निवृत्तीवेतनधारकांचे वय व त्यांच्या मुळ निवृत्तीवेतनांमध्ये करण्यात आलेली सुधारित वाढ पुढीलप्रमाणे आहे .

👉🌐शासन निर्णय येथे पहा 👈✅

  • वय वर्षे ८० ते ८५ - मूळ निवृत्तिवेतनात २०% वाढ
  • वय वर्षे ८५ पेक्षा अधिक ते ९०-  मूळ निवृत्तिवेतनात ३०% वाढ

  • वय वर्षे ९० पेक्षा अधिक ते ९५ - मूळ निवृत्तिवेतनात ४०% वाढ

  • वय वर्षे ९५ पेक्षा अधिक ते१००-  मूळ निवृत्तिवेतनात ५०% वाढ

  • वय वर्षे १०० पेक्षा अधिक - मूळ निवृत्तिवेतनात १००% वाढ

२. सदर लाभ केवळ दि.०१.०१.२०२४ पासून देय राहील. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही.


3. या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तिवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तिवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / कोषागार अधिकारी यांची राहील.


४. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे, यांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील.

state employee shasan nirnay

4. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहतील.

६. यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तिवेतनधारकांची निवृत्तिवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.


19. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४०११६१६१६२०७५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

#Pension


Scheme GR, #state employee GR, #state employee shasan nirnay, #पेन्शन शासन निर्णय, #राज्य कर्मचारी शासन निर्णय, #सरकारी कर्मचारी शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Post a Comment

0 Comments

close