ऑनलाइन लुटलेले पैसे मिळतात, मात्र एवढं करा...| Cyber Crime Money Refund process 2024

ऑनलाइन लुटलेले पैसे मिळतात, मात्र एवढं करा...| Cyber Crime Awareness 2024

Cyber crime amount refund process 2024

Cyber Financial Fraud refund:

      आजच्या महिती तंत्रज्ञान च्या जगात online cyber crime मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोक ऑनलाइन ऑफर्स आणि जॉब चे नावाने फसल्या जात आहेत. त्यांमध्ये ऑनलाइन जॉब फसवणूक (online jobs Fraud), LIC विमा पॉलिसी फसवणूक, Rewards program Fraud इत्यादी. 

आता जर एखाद्या व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक झाली तर प्रथम काय करायला पाहिजे ज्यामुळे पैसे परत मिळतील आणि गुन्हेगारवर कायदेशीर कार्यवाही होइल. गेल्या वर्षभरात ऑनलाइन व्यवहार करणारे हजारो- लाखो नागरिक भामट्यांना बळी पडले आहेत.  योग्य तांत्रिक ज्ञान नसल्याने १ लाख ११ हजार ३५७ हून अधिक नागरिक ऑनलाइन लुटीच्या जाळ्यात अडकले असल्याचे प्रमाण दिसत आहे. या नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर त्वरित पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे या सर्वांचे एकूण २६ कोटी ४८ लाख २२ हजार २०९ रुपये परत मिळवून देण्यात मुंबई पोलिस दलाच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे.

How to stop cyber frauds |सायबर फसवणुक कशी टाळावी:

  • सोशल मीडिया/ गुगल वरील माहितीची शहानिशा करावी.
  • तुम्हाला कुठल्याही क्रमांकावरून आलेल्या लिंकला क्लिक करू नका.
  • तसेच डेबिट, क्रेडिट कार्डचा नंबर, सीव्हीव्ही सांगू नका
  •  अन्यथा फसवणुकीला बळी पडाल आणि आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते तेव्हा सतर्क रहा असेही आवाहन पाेलिसांनी केले आहे.

सायबर क्राईम कसे करतात :

ऑनलाइनच्या स्मार्टनेसच्या युगात आता प्रत्येक नागरिकाच्या हाती मोबाइल असल्याने अनेक जण ऑनलाइन व्यवहाराला online transaction पसंती देत आहेत. तेव्हा ही बाब लक्षात घेत भामट्यांनी नागरिकांना लुटण्यासाठी गुगलवर जाळे पसरविले आहे. हे भामटे पुढील प्रकारे ट्रिक्स वापरून तुम्हाला फसवतात.

  • नामांकित हॉटेल, दुकाने, बँका, कंपन्यांसह तीर्थस्थळांच्या नावाने बोगस वेबसाइट भामट्यांनी तयार केल्या आहेत.
  •  या वेबसाइट गुगल सर्च इंजिनमध्ये टॉपला दिसत आहेत.
  • त्यामुळे अनेक जणांची ऑनलाईन फसवणूक होत आहे.

  •  Telegram मार्फत रेटिंग टास्क, rewards program असे आमिष दाखवून सुरवातीला Payment करून देतात. नंतर लाखो रुपयाचा चुना लावतात.
  • ऑनलाईन lottory सारखे आमिष दाखवतात.
  • ATM card बंद झाले सुरू करणेसाठी माहिती विचारतात.

तेव्हा नागरिकाने बँक विषयी असल्या प्रकारचे कोणतेही माहिती सांगू नये व अनोळखी लिंक वर क्लिक करू नये.

ऑनलाइन लुटलेले पैसे मिळतात, मात्र एवढं करा.

ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यावर त्वरित १९३० या टोल फ्री कमांकावर अथवा http://cybercrime.gov.in येथे तक्रार करा.

  • १९३० या टोल फ्री क्रमांक वर कॉल करा किंवा http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार दाखल करा.
  • तक्रार दाखल करताना आपले सर्व ट्रांजेक्शन डिटेल बँकेच्या अकाउंट डिटेल तयार ठेवा आणि नंतर अर्ज करा.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचा बँकेचा अकाउंट आयएफसी कोड माहित असायला हवा.
  • झालेल्या ट्रांजेक्शन चा यूपीआय आयडी किंवा ट्रांजेक्शन आयडी सुद्धा टाकावा लागेल.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक एक नॉलेजमेंट नंबर मिळेल त्यानुसार तुम्ही तुमचा आवेदन अर्ज ट्रॅक करू शकता.
  • या पोर्टलवरून तुम्ही तुमचे पैसे थांबवून मा.कोर्ट मार्फत किंवा पोर्टल मार्फत आपण आपल्या अकाउंट वर परत पैसे मिळू शकतो

जेवढ्या लवकर अर्ज केला तेवढ्या लवकर तुमचे पैसे परत मिळण्याचे शक्यता जास्त आहे.

डॉ. डी. एस. स्वामी,सायबर गुन्हे, मुंबई पोलिस

अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Post a Comment

0 Comments

close