महाराष्ट्र मेगा पोलीस भरती डिसेंबर नंतर होणार २५ हजार रिक्त पदे || Maharashtra Police Bharti 2021-22 Update

 महाराष्ट्र मेगा पोलीस भरती डिसेंबर नंतर होणार २५ हजार  रिक्त पदे || Maharashtra Police Bharti 2021-22 Update

                        

Maharashtra Police Bharti 2021-22 Big Bharti Update

पोलीस भरती २०२१-२२ :-

         महाराष्ट्र पोलीस भरती बाबत मोठी बातमी ! महारष्ट्रात पोलीस भरती ची प्रक्रिया हि कोरोन रोगाच्या प्रादुर्भावामुळे रखडलेली आहे. कोरोना रोगामुळे राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षाचे पेपर हे पुढे ढकलण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मुख्य म्हणजे MPSC Exam आहे. तसेच राज्यातील तरुण मुले हे महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत आसतात. आणि वर्षभर पोलीस भरती मैदानी सराव आणि पेपर सराव करत असतात. आणि या स्वपनाला कोरोनाणे समोर ढकलेले आहे. परंतु आता कोरोनाचा प्रसार हा काही प्रमाणात कमी-कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य  प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत रिक्त होणार्या पदांची माहिती तत्काळ सर्व पोलीस घटकाकडून मागविण्यात आली आहे. त्याबाबत चे पत्र आपण खाली पाहू शकता.  

        महाराष्ट राज्यात ग्रामीण व शहरी भागातील पोलीस शिपाई तसेच चालक पोलीस शिपाई यांची किती पदे रिक्त आहेत याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य  प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी तत्काळ मागितली आहे. 

पोलीस शिपाई तसेच चालक पोलीस शिपाई रिक्त पदांची माहिती खालील घटकाकडून मागीविण्यात आली आहे:-

१) महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्त 

२) महाराष्ट्रातील सर्व पोलीस आधिक्षक (नाशिक ग्रा. वगळता)

३) पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई ) 

४) महाराष्ट्रातील सर्व समादेशक (SRPF ग्रुप ०१ ते १६) या सर्व  कार्यालयाकडून माहिती हि तत्काळ मागितली आहे.

या माहिती बद्दल लोहमार्ग अप्पर पोलीस महासंचालक, SRPF चे  पोलीस अप्पर महासंचालक, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली व नागपूर तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व विशेष पोलीस  महानिरीक्षक व राज्य राखीव पोलीस बलाचे विशेष पोलीस महासंचालक या सर्वाकडून पोलीस भरती २०२१-२०२२ मध्ये रिक्त होणार्या पदाची माहिती ही तत्काळ मागितली आहे. 

(महाराष्ट्र राज्य  प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कडील पत्र पहा :-)

 

या मागील महत्वाच्या प्रमुख बाबी :---
१) पुढील ०२ वर्षात होणारी पोलीस भरती हि एकत्रित राबवली जाणार आहे.
२) कोरोनामुळे पोलीस दलातील मृत्यू पावलेल्या तसेच सेवानिवृत्त, बडतर्फ, तसेच निलंबन आणि पदोन्नती मुले संबधित घटकात रिक्त झालेली रिक्त पदे किती आहेत.
३) २०१९ ते २०२० मधील 12,५०० (साडेबारा हजार) जागा रिक्त आहेत
४) आणि आता २०२१ ते २०२२ मधील होणार्या रिक्त जागा बाबत माहिती.
5) तेव्हा डिसेंबर २०२० नंतर एकूण २५ हजार जागा रिक्त होणार आहेत आणि यामुळेच २५,००० जागांची मेगा पोलीस भरती होणार आहे. 



Post a Comment

0 Comments

close