आता घरकुल जागा खरेदी साठी मिळणार 01 लाख रुपये अनुदान..! Pandit dindayal Upadhyay gharkul Anudan Yojana 2024

 पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान..

gharkul yojana,gharkul yojana 2023, gharkul yojana 2024, pradhan mantri gharkul yojana, pradhanmantri gharkul yojana

Pandit Dindayal Upadhyay Gharkul Yojana 2024:

      महाराष्ट्रामध्ये गरीब आणि गरजू नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत Gharkul Yojana,  राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना याशासनामार्फत राबवली जाते. परंतु घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्याने घरकुल कोठे बांधणार? असे प्रश्न उपस्थित होते तेव्हा शासनाने भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी जे अनुदान दिले जाते त्यामध्ये ५० हजार रुपयावरून आता ०१ लाख रुपये पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आला आहे.

    महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 10 जानेवारी 2024 अन्वये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल खरेदी योजना भूमिहीनांना एक लाख रुपये अनुदान देणेबाबत प्रस्ताव मंजूर केलेला आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना 2024:-

आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी शासनाने लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य वाढून देण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय

  • राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते अनुदान

  • केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना केली सुरु
  • या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते, त्यात वाढ करुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय

👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉अधिकृत वेबसाईट येथे पहा 

ग्राम पंचायत घरकुल योजना नुसार घर बांधण्यासाठी पूर्वी जागा खरेदी करणे अनुदान हे पन्नास हजार रुपये होते आता ते वाढवून एक लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेले आहे यामुळे लाभार्थ्यांना भरपूर फायदा होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. 

तथापि, या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन, राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किंमती पाहता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान १ लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

योजनेचे नांव | Pandit dindayal Upadhyay gharkul Anudan Yojana 2024 :

पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

केंद्र पुरस्कृत / केंद्र राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत

राज्य पुरस्कृत

योजना कधी सुरु झाली

2017-18

योजनेची थोडक्यात माहिती

  •  उद्देश - केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांस जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
  • घरकुलासाठी 500 चौ. फू. पर्यंत जागा खरेदीसाठी प्रति लाभार्थी रु. 100000/- पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते.
  • जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय /संपादित जागा आणि ग्राम पंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा विनामूल्य उपलब्ध करण्यात येते.

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)

वर्ष उद्दिष्ट उद्दिष्टानुसार आवश्यक निधी (रु. लाखात)

2018-19 6558 3279.0

2019-20 1700 850.0

2020-21 2023 1011.5

2021-22 492 246.0

एकूण 10773 5386.5

योजनेच्या लाभाचे स्वरुप

वैयक्तीक लाभाची योजना

योजनेचे निकष

केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थी

लाभार्थ्याची पात्रता

केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थी

अर्ज कुठे करावा

गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करणे

काही महत्त्वाच्या लिंक्स

अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Post a Comment

0 Comments

close