Maharashtra TET Sylllabus pdf for Paper 1 & 2 In Hindi Marathi Download || MAHA TET 2021 exam

 MAHA TET 2021 exam dates announced; 40,000 post | राज्यात दोन वर्षांनी होतेय शिक्षक पात्रता परीक्षा, तारखा जाहीर  

TET2021 Exam Date Who are eligible for Tet How many times Tet is conducted in a year? Is TET exam difficult? What is the salary of Ctet teacher?

MAHA TET Syllabus 20021 in Marathi Language Maharashtra TET Exam Paper I & Paper II Pattern:-

Maha TET Paper-1 Pattern 2021

Subject Name

विषयाचे नाव 

Total Mark

एकूण मार्क 

Maximum Mark

जास्तीत जास्त मार्क 

बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र

30 

30

मराठी भाषा

30 

30

इंग्रजी व्याकरण

30 

30

गणित

30

30

परिसर अभ्यास

30 

30

एकूण मार्क 

150

150

MAHATET 2021 परीक्षेचे आयोजन सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 कालावधीत करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे स्टोरी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि कोणकोणत्या घटकावर अभ्यास करावा लागेल याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तेव्हा पोस्ट पूर्ण वाचा 

महाराष्ट्र शासनाने MAHATET 2021 परीक्षेचे आयोजन करण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस मान्यता दिली आहे. सदर परीक्षा 15 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 कालावधीत होणार होणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम, आगामी काळात शिक्षक भरतीची शक्यता व महत्वाची संदर्भ पुस्तके पुढीलप्रमाणे आहे:-

       जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, माध्यमिक शाळेतील 13 हजार अशी एकूण 40,000 पदे रिक्त आहे. त्यामुळे आगामी काळात TET परीक्षा झाल्यानंतर TAIT परीक्षा घेऊन सदर पदे भरली जाऊ शकतात, याबाबत शिक्षक पदवी प्राप्त उमेदवारांकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र शिक्षण विभाग या जागा टप्याटप्याने भरणार आहे.

💢➣TARGET MAHA TET 2021 परीक्षा अभ्यासक्रम व  तयारी करणेकरीता उपयुक्त संदर्भ पुस्तकं तसेच महत्वाची मुद्दे सविस्तर दिले आहेत:-

#(1)TET पेपर 1 अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक

#१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)#

          यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन ज्या घटकांवर आधारित प्रश्न समावेश करण्यात येतो तरी मानसशास्त्र बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयांचा तीस गुणांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे.

आता बालमानसशास्त्र व अध्यापन मानसशास्त्र याकरिता महत्वाचे संदर्भ पुस्तक पुढील प्रमाणे:-

१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे 

#2.मराठी भाषा(30 गुण)

       मराठी भाषा या विषयावर आधारित मराठी व्याकरण या घटकातील  व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात मराठी घटकावर 30 गुण अवलंबून आहेत.

#महत्वाची संदर्भ पुस्तके:-

 1)के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ

#3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

            मराठी व्याकरण प्रमाणेच इंग्रजी व्याकरण मध्ये सुद्धा एकूण 30 गुणांकरिता प्रश्न विचारण्यात येतील त्यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

इंग्रजी व्याकरण करता महत्वाचे संदर्भ पुस्तके पुढील प्रमाणे:-

 के सागर/बाळासाहेब शिंदे 

#4.गणित (30 गुण)

        या परीक्षेसाठी गणित हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे गणित विषयातील महत्त्वाचे घटकातील विविध  घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात या गणित विषयाला एकूण 30 गुण देण्यात आले आहेत. 

महत्वाची संदर्भ पुस्तके:-

नितीन महाले/शांताराम अहिरे/ सतीश वसे

#5.परिसर अभ्यास (30 गुण)

   परिसर अभ्यास हा विषय शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विषय आहे त्यामुळे या विषयाचा समावेश आवर्जून करण्यात आला आहे तेव्हा या घटकावर  परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित मूळ प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके:-

१.पाचवी ते दहावीची संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके/प्रा.अनिल कोलते/विनायक घायाळ

#TET2021 Exam Date Announced

 TET Exam 2021 मधील घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ पुस्तकं पुढील प्रमाणे:-

 👉TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (तिसरी आवृत्ती)

 👉 TET Exam 2021 परीक्षभिमुख दृष्टीकोन पाहण्यासाठी व तयारी कशी करावी या करिता मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक आहे.

     TET पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती व अभ्यासाचा परीक्षाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यासाठी  काही महत्त्वाच्या बाबी म्हणजे

 • मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, 
 • प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करणे 

अत्यंत महत्वाचे आहे.

 2013 ते 2019 पर्यंत TET परीक्षा 6 वेळा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेच्या 6 प्रश्नपत्रिका समजून घेऊन अभ्यासास सुरवात केल्यास परीक्षभिमुख अभ्यास होईल, तसेच परीक्षेसाठी कोणते घटक महत्वाचे आहे, ते लक्षात येईल.

प्रश्नपत्रिका महत्वाचे संदर्भ पुस्तक

       TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2019 च्या मागील 6 प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते,के'सागर पब्लिकेशन्स,पुणे

पेपर क्रमांक 02

Maha TET Paper-2 Pattern 2021

Subject Name

विषयाचे नाव 

Total Mark

एकूण मार्क 

Maximum Mark

जास्तीत जास्त मार्क 

बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र

30 

30

मराठी भाषा

30 

30

इंग्रजी व्याकरण

30 

30

गणित व विज्ञान

30

30

सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल 

30

30

एकूण मार्क 

150

150  

#(2)TET पेपर 2 अभ्यासक्रम,तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक:-

#१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

           बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 11 ते 14 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न या पेपर क्रमांक 02 मध्ये विचारले जातात. यामध्ये अध्ययन, अध्यापन,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.

बालकांच्या मानसशास्त्र तयारी करीता महत्वाचे संदर्भ पुस्तक:-

१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के' सागर पब्लिकेशन्स, पुणे 

#2.मराठी भाषा(30 गुण)

       पेपर क्रमांक 02 मध्ये मराठी विषयांची प्रश्न पातळी ही थोडी काठिण्य पातळी चा विचार करून तयार केली जाते यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

मराठी भाषा पेपर क्र.02 करिता महत्वाची संदर्भ पुस्तके:-

 के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ

#3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

            पेपर क्रमांक 02 मध्ये सुद्धा इंग्रजी विषयांची प्रश्न पातळी ही थोडी काठिण्य पातळी चा विचार करून तयार केली जाते इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके:-

 के सागर/बाळासाहेब शिंदे

 #4.गणित व विज्ञान (30 गुण)

        पेपर क्र. 02 मध्ये गणित घटकावर एकूण 30 व विज्ञान घटकासाठी सुद्धा  30 गुण असे 60 गुण देण्यात येत आहेत.    

 4.1- गणित 

        यात विविध सरासरी,बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार, काळ काम वेग, कालावधी इ. गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. 

#गणित घकाच्या तयारी करिता महत्त्वाचे संदर्भ पुस्तके:-

 नितीन महाले/शांताराम अहिरे/सतीश वसे

4.2- विज्ञान 

     यामध्ये विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील मूलभूत संकल्पनांवर आधारित  प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके:-

प्रा.अनिल कोलते/कविता भालेराव/विनायक घायाळ

#5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (30 गुण)

    5.1- इतिहास 

            इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत यावर आधारित मूलभूत प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके:-

१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके

   5.2 - भूगोल.

    भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोलचे बेसिक प्रश्न विचारले जातात.

भूगोल विषयांच्या तयारी करिता संदर्भ पुस्तके:-

१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके 

  

TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ

.TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे

Maharashtra TET Sylllabus pdf for Paper 1 & 2 In Hindi Marathi Download  here 

MAHA TET 2021 exam previous year paper pdf download here...

#TET2021 Exam Date Announced 

    TET EXAM 2021 Important Tips for study management | टीईटी परीक्षा तयारी महत्वाच्या बाबी :-

 • बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
 • मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.
 • टीईटी परीक्षेत 90 प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.
 • वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.
 • बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.
 • परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.
 • इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावीत.
 • शक्य असल्यास नोट्स काढा/पाठ्यपुस्तकातीळ महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.
 • प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.
 • टीईटी परीक्षा होईपर्यंत फेसबुक, व्हाट्सप पासून दूर राहिल्यास बराच अभ्यासक्रम कव्हर होईल.
 • परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.

              👍Best of luck👍

#आपल्या एका share करण्याने गरजू विद्यार्थ्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळेल#*

Post a Comment

1 Comments

Thanks For Comment

close