या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! एक महिन्याच्या पगाराइतका बोनस जाहीर ...
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?
- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयानुसार केंद्र कर्मचारी गट "ब" आणि केंद्र कर्मचारी गट "क" येणाऱ्या राजपत्रित कर्मचाऱ्यांना ही बोनस दिला जाईल. हे असे कर्मचारी आहेत जे कोणत्याही प्रॉडक्टिव्हिटी लिंक्स Ad-hoc Bonus बोनस योजनेत समाविष्ट नाहीत.
- या बोनस योजनेचा लाभ केंद्र कर्मचाऱ्यांमधील निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या बोनसचा लाभ मिळणार आहे.
- त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या हंगामी कामगारांना सुद्धा या बोनस योजनेचा लाभ मिळणार आहे.
या कर्मचाऱ्यांना ही मिळणार बोनस
- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बोनस नुसार जे कर्मचारी 31 मार्च 2000 रोजी किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत
- किंवा ज्यांनी राजीनामा दिलेला आहे अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा विशेष बाब म्हणून सदरचा बोनस देण्यात येईल.
- त्याचप्रमाणे आर्थिक वर्षात सहा महिने नियमित कर्तव्य बजावणारे कर्मचारी सुद्धा ऍडव्होक बोनस साठी पात्र राहतील.
- त्याचप्रमाणे 31 मार्च पूर्वी वैद्यकीय कारणास्तव जे कर्मचारी सेवा नियुक्त झालेले आहेत किंवा ज्यांचे मरण झालेले आहे त्यांच्या परिवारांना सुद्धा सदरचे बोनस देण्यात येईल.
सौजन्य:- ऑनलाईन न्यूज नेटवर्क
No comments:
Post a Comment
Thanks For Comment