ग्रामपंचायत सरपंचाला पगार किती? आपल्या गावच्या सरपंचाचा पगार येथे पहा | Sarpanch Salary
मित्रांनो ग्रामपंचायत सरपंच यांचा मानधन हे गावातील लोकसंख्येनुसार शासनाने निर्धारित केलेले आहे त्यानुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्या निहाय वर्गवारी नुसार सरपंचांना दरमहा मानधन रक्कम देण्यात येते ती पुढील तक्त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल.
- जर एखाद्या गावची लोकसंख्या शून्य ते 2000 पर्यंत असेल तर त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला एक हजार रुपये दरमहा मानधन देण्यात येते आणि शासन अनुदान टक्केवारी 75 टक्के नुसार शासन अनुदान रक्कम साडेसातशे रुपये देण्यात येते.
- जर गावाची लोकसंख्या 2001 ते आठ हजार पर्यंत असेल तर त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला दीड हजार रुपये मानधन देण्यात येते.
- आणि गावाची लोकसंख्या आठ हजार पेक्षा जास्त असेल तर त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला दोन हजार रुपये मानधन देण्यात येते.



No comments:
Post a Comment
Thanks For Comment