अखेर या राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ! शासन निर्णय निर्गमित दिनांक 23 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र राज्य निवृत्तीवेतनधारक कर्मचारी शासन निर्णय:
महाराष्ट्र राज्यातील पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीत निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक एक जुलै 2018 ते दिनांक 1 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई वाढ देण्याबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे आहे.
👉👉शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
सदर शासन निर्णयानुसार शासन असा आदेश देत आहे की, जे राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक अद्यापही सुधारित वेतनश्रेणीत म्हणजेच पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत, त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन रकमेवर अनुज्ञेय महागाई वाढीचा दर पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात यावा.
वरील नमूद महागाई वाढीनुसार अनुज्ञेय थकबाकी माहे नोव्हेंबर 2022 च्या निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन सोबत रोखीने अदा करण्यात यावी असा आदेश आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
👉👉शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारंसह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment