अर्जित रजा रोखिकरण संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.06.12.2022

अर्जित रजा रोखिकरण (EL) संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.06.12.2022

अर्जित रजा सुधारीत नियम:  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे आणि अशा संचित अर्जित रजेचे रोखीकरण करणे बाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर अजित रजा रोखीकरण सुधारित शासन निर्णय पुढीलप्रमाणे:
  • मुख्याध्यापकांना काम नसताना सुट्टीच्या कालावधीत शाळेत हजर राहण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये अथवा त्यासाठी वेतन कपात करण्यात येऊ नये.
  • सुट्टीच्या काळात शालेय कार्यालयातील कामकाज या दिवशी केले जाईल त्या दिवशी मुख्याध्यापकांनी हजेरी पत्रकात सही करणे आवश्यक राहील.
  • सुट्टीच्या कालावधीमध्ये मुख्याध्यापकांनी केलेल्या कामाच्या प्रयोजनार्थ पंधरा दिवसाची विशेष अर्जित रजा अनुज्ञेय आहे.
  • म्हणजेच किमान 30 दिवस कार्यालयात उपस्थित राहून काम करणे अपेक्षित आहे.
  • मात्र शाळेत उपस्थित असल्याच्या दिवशी पूर्ण वेळ उपस्थिती आवश्यक आहे असे नाही.
  • एकंदरीत कामाच्या बाबतीनुसार उपस्थिती आवश्यक ठरेल.
  • मुख्याध्यापक सुट्टीच्या कालावधीत अनुपस्थित राहिल्यास त्यांना ध्येय अर्जित रजा मान्य होणार नाही.
  • तशीच शाळेची निकडीची व महत्त्वाची कामे वेळेत पारण पाल्याबद्दल मुख्याध्यापकांना दोषी धरून त्यावर गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी हे शिस्तभंगाची कारवाई करू शकतील.
  • 👉👉📂 शासन निर्णय येथे पहा 👈👈
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टी कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाच्या मोबदल्यात मुख्याध्यापक पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून प्रति वर्ष 15 दिवसाची अर्जित रजा अनुदनीय करणे व सदर संचित अर्जित रजेचे रोखीकरण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

जिल्हा परिषद माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई म्हणून दरवर्षी पंधरा दिवसाची अर्जित रजा देण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाच्या दिनांक 3 डिसेंबर 1988 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील दीर्घ सुट्टी विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि पाणीवाला यांना सध्या अनुज्ञेय असलेल्या एकूण वीस दिवस अर्धवेतने रजे ऐवजी दिनांक 1 जानेवारी 1997 पासून प्रत्येक कॅलेंडर वर्षात दहा दिवस अर्जित रजा अनुज्ञेय राहील अशी तरतूद वित्त विभागाच्या दिनांक सहा डिसेंबर 1996 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे.
खाजगी शाळातील मुख्याध्यापकांना मोठ्या सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ प्रत्येक पूर्ण वर्षासाठी पंधरा दिवसाची अर्जित रजा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 15 मे 1999 च्या शासन परिपत्रकानुसार अनुज्ञेय करण्यात आली आहे.

👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈

सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.  

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


Post a Comment

0 Comments

close