Old Pension scheme : कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला यश; मुख्यमंत्री श्री शिंदेंनी दिले मोठे आश्वासन!

Old Pension scheme : कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला यश; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले मोठे आश्वासन 

Old pension scheme latest update

Old Pension scheme : राज्य सरकारने लागू केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी मंगळवार दिनांक २७/१२/२०२२ रोजी राज्यभरातून ०१ लाखापेक्षा जास्त कर्मचारी नागपुरात (Nagpur Hiwali Adhiveshan) हिवाळी अधिवेशनावर धडकले. हा मोर्चा नागपूरकरच नव्हे तर राज्यकर्त्यांच्या मनात धडकी भरवणारा ठरला. यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना निविदेन दिले.

त्यानंतर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की ''राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या' शिष्टमंडळाने आज भेट घेऊन त्यांची कैफियत मांडली'' यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत केंद्र सरकारच्या धर्तीवर त्यांना उचित लाभ मिळवून देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत आश्वस्त केले'', असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

  •    तसेच यावेळी जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल असे स्टेटमेंट घेणारे माननीय श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते.
  •  तसेच शिक्षक आणि पदवीधर आमदार उपस्थित होते. 
  • मुख्यमंत्री शिंदे यांनी मयत कर्माचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय दिला आहे. 
  • फमिली पेन्शन आणि ग्रॅज्यूटी देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. 
  • फॅमिली पेन्शन(family pension) म्हणजे, एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाले तर त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळणार आहे.
  •  त्यामुळे एक मागणी पूर्ण केली, असे म्हणता येईल. मात्र, मोठी मागणी ही (old pension scheme) जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close