राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : दोन वर्षांची मिळणार अतिरिक्त सेवा !
Retirement age 60 GR शासन निर्णय :-
राज्य कर्मचाऱ्यांकरता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत शासन निर्णय जाहीर होणार आहे. हिवाळी अधिवेशन मध्ये च्या प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अशी माहिती मिळत आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे बाबत राज्य सरकार सकारात्मक दिसून येत आहे आणि लवकरच याबाबत शासन निर्णय सुद्धा निघणार आहे.
02 दोन वर्षात रिक्त सेवा मिळणार:-
महाराष्ट्र राज्य शासनाला दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. या निर्णयावर सरकारने शिक्कामोर्तब केल्यास राज्य सरकारी कर्मचारी जे उशिरा शासन सेवेत रुजू होतात त्यांना अशा कर्मचाऱ्यांना सेवेचा कालावधी कमी मिळत असतो त्यामुळे जर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झाल्यास कर्मचाऱ्यांना दोन वर्ष अधिक सेवा करण्यास मिळते.
केंद्रीय सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्याने देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय हे 60 वर्ष करण्यात यावे याबाबत सरकार सकारात्मक दिसत आहे. केंद्र सरकारच्या धरतीवरच महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावी अशी मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडून होत असताना दिसत आहे.
हे सुध्दा वाचा: राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा धक्का !पगारीला लागणार कात्री लागणार, परिपत्रक निर्गमित..
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 58 वर्षावरून 60 वर्ष होणार महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये कार्यरत असलेले शासकीय तसेच जिल्हा परिषदा तसेच इतर शासकीय पात्र कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये 58 वर्षावरून साठ वर्षापर्यंत वाढ होणार आहे. महाराष्ट्र मध्ये सध्या शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट वय हे 58 वर्षे आहे तर वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट वय 60 वर्षे आहे आणि जर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची अतिरिक्त सेवा करण्याचा लाभ या ठिकाणी प्राप्त होणार आहे.
महाराष्ट्र शासन मागील तीन ते चार वर्षापासून कोणत्याही मोठ्या प्रकारची भरती घेतली नाही त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास नवीन भरती करण्याची शक्यतो गरज भासत नाही त्यामुळे याबाबत सरकार सकारात्मक असल्याची दिसून येत आहे आणि लवकरच या संदर्भात महाराष्ट्राचे सरकारकडून मोठा निर्णय येणार आहे.
महाराष्ट्र मध्ये विविध कर्मचारी संघटनामार्फत सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे याबाबत राज्य सरकारला निवेदने सादर करण्यात आलेले आहेत. यावरील कारणांवरून महाराष्ट्र राज्य शासन सुद्धा लवकरच याबाबत निर्णय जाहीर करणार आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षे करणेबाबत सरकार सकारात्मक दिसत आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये सदरच्या निर्णयाबाबत विचार करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच याबाबत शासन निर्णय सुद्धा जाहीर करणार आहे.
शासकीय निर्णय बाबत लेटेस्ट अपडेट करता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तसेच टेलिग्राम चॅनेल ला सुद्धा जॉईन व्हा.
धन्यवाद.....!
1 Comments
सेवानिवृत्ती वय 60 वर्ष मागणी दिसते इतर राज्य केंद्र यांच्याशी तुलना करता मग जुनी पेन्शन योजना नको म्हणून कोणी एक व्यक्ती दाखवावी शासनाने
ReplyDeleteसर्व विभाग व स्तरातील कर्मचारी यांची मागणी कित्येक वर्षांपासून आहे की जुनी पेन्शन योजना सुरू करावी मग ती का नाही सुरू केली जात?60 वर्ष वय वाढवण्यापेक्षा 5 वर्ष कमी करा आणि नवीन पिढीला बेरोजगार लोकांना भरती करुन घ्या .
Thanks For Comment