सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आठवा वेतन आयोगानुसार होणार भरमसाठ वाढ ! 8th pay commission update

8th p ay commission update | सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आठवा वेतन आयोगानुसार होणार भरमसाठ वाढ !

आठवा वेतन आयोग
  नमस्कार ! येत्या दिवाळी सनादरम्यान मोठी गुड न्यूज सरकारी कर्मचारी यांच्यासाठी येणार आहे ती म्हणजे आठव्या वेतन आयोग लवकरच येणार आहे ! आणि (8th pay commission Update) आठव्या वेतन आयोगानुसार 44 टक्के होऊन अधिक पगार वाढ होणार आहे. दर 10 वर्षाच्या फरकाने वेतन आयोग लागू होत असतो त्यानुसार 2023 मध्ये आठवा वेतन आयोग लागणार आहे.

      सातव्या वेतन आयोगा नंतर आता आठव्या वेतन आयोगाची तयारी शासनाने सुरू केली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र कर्मचाऱ्यांच्या विविध पदांच्या पगारामध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कामगार युनियन मार्फत वेतन वाढीसाठी तसेच येणाऱ्या आठव्या वेतन आयोगासाठी काही मागण्या करण्यात येत आहेत.

8th pay commission Update:

      सध्या सातव्या वेतन आयोगा अंतर्गत कर्मचाऱ्यांना किमान वेतन मर्यादा 18000/- रुपये आहे.यामध्ये प्रत्येक ग्रेड वर समान फिटमेंट लागू करण्यात आलेला आहे त्याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार निश्चित करण्यासाठी नवीन बाबींवर काम जाईल अशी कबुली दिली आहे सध्या सुधारित मूळ वेतनाची गणना ही फिटमेंट फॅक्टरच्या आधारे जुन्या मूळ वेतन आयोगातूनच केली जाते.

हे सुध्दा वाचा: राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा धक्का !पगारीला लागणार कात्री लागणार, परिपत्रक निर्गमित..

       सातवा वेतन आयोगाची तफावत आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी बाबत प्रस्ताव केंद्र शासनाला कामगार युनियन मार्फत सादर करण्यात आलेले आहेत. तसेच आठव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 3.68% म्हणजेच 44.44% वेतन वाढ होणार आहे. 8th pay commission salary increase calculator नुसार पगारामध्ये 3.68% वाढ लागू होऊ शकते.

आतापर्यंत वेतन आयोगाने पुढील प्रमाणे (Fitment factor) फिटमेंट फॅक्टर नुसार पेमेंट वाढले आहे:-

4th Pay Commission ने वाढला पगार

 • पगार वाढ : 27.6%
 • किमान वेतनस्केल : रु.750
5th Pay Commission ने वाढलेला पगार

 • पगारवाढ : 31%
 • किमान वेतन स्केल : रु. 2,550

6th Pay Commission ने वाढलेला पगार

 • फिटमेंट फॅक्टर : 1.86 पट
 • पगार वाढ: 54%
 • किमान वेतन स्केल :रु. 7,000

7th Pay Commission ने वाढलेला पगार

 • फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
 • पगारवाढ: 14.29%
 • किमान वेतन स्केल : रु. 18,000

salary after 8th pay commission:- 

      सूत्रांच्या माहितीनुसार जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर पुढील प्रमाणे वेतन वाढ होणे अपेक्षित आहे.
8th Pay Commission ने किती वाढेल पगार
 • फिटमेंट फॅक्टर : 3.68 पट वाढणे अपेक्षित 
 • वाढ : 44.44%
 • किमान वेतनमान: रु. 26000 /- वाढणे अपेक्षित
            सध्या तरी 8 वा वेतन आयोग बाबत कोणताही प्रस्ताव नाही आहे . पन लवकरच यावर निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना सध्या 14.29% पगार वाढ करण्यात आलेली होती. तर आठव्या वेतन आयोगामध्ये आतापर्यंतच्या नियमानुसार तसेच संघटनेच्या प्रस्तावानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 3.68 पट म्हणजे 44.44% वेतन वाढ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
(10/20/30 आश्वासित प्रगती योजना बाबत)

   महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन दुरुस्तीपत्र क्रमांक वेतन: 1119/प्र. क्रमांक.03/2019/सेवा-3 दिनांक 7 ऑक्टोंबर 2022 अन्वये. 

      वेतन वाढ करण्यासाठी कर्मचाऱ्याकडून निवेदने- प्रस्ताव देखील शासनाला दिली जात आहेत तसेच आठव्या वेतन आयोग बाबत प्रस्ताव देखील शासनाला वेगवेगळ्या संघटनेमार्फत पाठवण्यात आले आहेत त्यामुळे लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार आहे असे दिसून येत आहे.

   केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचारी यांच्या पगारांमध्ये सुद्धा वाढ होत असते त्यानुसार राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा केंद्रीय कर्मचारी बरोबरच आठवा वेतन आयोग लागू होणार आहे.

   आठवे वेतन आयोगाच्या बाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यास देशातील इतर राज्यांना सुद्धा आठव्या वेतन आयोगाचा स्वीकार करावा लागेल.

 8th pay commission salary increase:  

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे ती म्हणजे आठवा वेतन आयोग लवकरच येणार, अशी चर्चा होती. सरकारी विभागामध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू आहेत त्यानुसार 2023 मध्ये आठवा वेतन आयोग नियोजित केला जाणार आहे आणि आठवा वेतन आयोग लागू झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

3 Comments

 1. महागाई ही काय फक्त सरकारी कर्मचार् यांसाठीच वाढली आहे काय? सरकार ने असा काहीतरी कायदा काढावा, जेणेकरून खाजगी वाल्यांना पण वाढत्या महागाई ची झळ बसणार नाही. कारण पोट तर सगळ्यांना च आहे ना... सरकार ने या बाबतीत क्रृपया विचार करावा.

  ReplyDelete
 2. आठवा वेतन आयोग 2026 ला नियमाने लागणार आहे अजून चार वर्ष बाकी आहे ..सातवा वेतन आयोग 2016 ला लागला होता .. त्यामुळे अश्या फालतू बातमी कडे वाचकांनी लक्ष घालावं नाही.

  ReplyDelete
 3. पगारवाढ देण्याऐवजी पुन्हा पेन्शन योजना सुरू करावी

  ReplyDelete

Thanks For Comment

close