RBI Important Cyber Updates | Major Changes in UPI | दोन हजाराची लिमिट | व्यवहार सेटलमेंट चार तास वेळ लागेल सविस्तर नियम खाली पहा.
RBI ने NPCI च्या मार्फत रन होणार्या सर्व प्रकारच्या UPI पेमेंट सिस्टीम मध्ये 01 जानेवारी 2024 पासून महत्वाचे बदल केले आहेत. सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन सायबर गुन्ह्याला वाढ झालेली आहे त्यामुळे सदरच्या निर्णया ऑनलाइन सायबर क्राईम ला नक्कीच आळा घालेल.
हे बदल करणे RBI ला का गरजेचे होते हे पुढील आकडेवारी वरून पाहू.
भारत देशात UPI चे एकूण वापरकर्ते - 40 कोटी आहेत. सन 2023 या वर्षात नोव्हेंबर पर्यंत UPI च्या माध्यमातुन झालेली ट्रान्झ्याक्शन्स हे 11 बिलियन एवढी आहे. एक बिलियन म्हणजे १०० करोड म्हणजे अकराशे करोड रुपयाचा ऑनलाईन फ्रॉड झालेले रक्कम आहे. या सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आरबीआयने हे नियम लागू केलेले आहेत.
- UPI द्वारे 2023 या वर्षात झालेल्या व्यवहारांचे मुल्य - ₹ 16 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त.
- 2023 या वर्षात UPI द्वारे सायबर गुन्ह्यात चोरी झालेली रक्कम - ₹ 30 हजार करोड रुपये.
- येत्या 3 वर्षात UPI चा अपेक्षित वापर - 100 बिलियन ट्रान्झ्याक्शन्स.
------------------------------ --------
Major Changes in UPI From 01 January 2024 | एकूण ०९ नियम लागू करण्यात आले आहेत सविस्तर पणे पुढे वाचा
सायबर गुन्हेगारांकडून UPI च्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची रक्कम खूपच मोठी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव RBI ने पुढील बदल केले आहेत.
UPI Transaction Charges new online payment rules in 2024 : Limit Per Day, Guidelines, Applicability, Rules And Everything You Need To Know
1) UPI payment app सस्पेंड होणार ( वापरात न आलेले UPI बंद होणार ) :-
जर आपण GPay, PhonePe, Paytm, Bhim... ईत्यादी UPI पेमेंट App फोन मध्ये ईनस्टॉल केली असतील आणि जानेवारी ते डिसेंबर 2023 या एक वर्षाच्या काळात ज्या App चा जर एकदाही वापर केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून ती App ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंन्ड केली जातील.
2) UPI payment पेमेंट लिमिट -
डेली पेमेंट लिमिट जास्तीतजास्त 1 लाख रुपये असेल हा महत्वाचा निर्णय असणार आहे.
3) स्पेशल पेमेंट लिमिट -
फक्त हॉस्पिटल्स व शैक्षणिक संस्था यांना एका दिवसात जास्तीतजास्त 5 लाख रुपये.म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेज चि 5 लाख रुपया पर्यन्तची फी UPI द्वारे भरता येईल.
4) ट्रान्झ्याक्शन सेटलमेंट टाइम UPI settlement time -
०१ जानेवारी २०२४ पासून रुपये 2,000/- पेक्षा जास्त रकमेचे सेटलमेंट होण्यास 04 तास लागणार आहेत.
RBI ने सायबर गुन्हेगारी Cyber crime रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. आत्ता पर्यंत ट्रान्झ्याक्शन झाले की लगेचच विक्रेत्याच्या अकाऊंट ला पैसे जमा व्हायचे,
जानेवारी नंतर तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीस, शॉप ला किंवा ऑनलाईन ₹ 2000 पेक्षा जास्त रक्कम UPI ने पेड केली असेल तर त्या विक्रेत्याच्या अकाऊंट ला ती रक्कम जमा होण्यासाठी 4 तास लागणार आहेत.
पण तुम्ही ती व्यक्ति किंवा दुकानदाराला नेहमी (Frequently) UPI द्वारे पेमेंट करत असाल तर हा नियम लागू होत नाही.
5) UPI ट्रान्झ्याक्शन कॅन्सलेशन ऑप्शन (we can cancel UPI transaction within 04 hours)-
येथून पुढे UPI द्वारे नवीन व्यक्ति, दुकानदाराला किंवा ऑनलाईन पेमेंट केल्या नंतर 04 तासाच्या आत तुम्ही ते ट्रान्झ्याक्शन कॅन्सल करू शकणार आहे, असे कॅन्सल केलेल्या ट्रान्झ्याक्शन चे पेमेंट Revert होऊन मूळ अकाऊंट ला जमा होईल.
याचा फार मोठा उपयोग सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळविण्यासाठी होईल किंवा चुकून दुसर्याच्या अकाऊंट ला पैसे गेले असतिल तर असे पेमेंट लगेच परत मिळू शकेल.
पण याचा एक मोठा तोटाही आहे, जर तुम्ही नवीन ठिकाणी 2000 रुपयां पेक्षा जास्त रकमेची UPI द्वारे खरेदी केली तर दुकानदार त्या वस्तूची डीलीव्हरी चार तासांनी देईल कारण चार तासांत तुम्ही ट्रान्झ्याक्शन कॅन्सल करू शकता हे त्यालाही माहिती असल्याने तो रिस्क घेणार नाही, तसेच हॉटेल मध्ये जेवायला गेलो आणि बिल 2000 पेक्षा जास्त झाले तर हॉटेल मालक UPI Accept करणार नाही, तिथे तुम्हाला पूर्वी सारखे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरावे लागेल.
6) विक्रेत्याचे खरे नाव डिस्प्ले होणार -
बर्याच वेळा आपल्या मोबाईल मध्ये एखादा नंबर विशिष्ठ नावाने सेव्ह असतो, नंतर ती व्यक्ति आपला मोबाईल नंबर बदलते. मोबाईल कंपनी सहा महिन्यांपासून रिचार्ज न केलेला/बंद असलेला नंबर दुसर्या कोणाला तरी विकते. आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या नंबर वर पेमेंट करतो पण ते जाते भलत्याच व्यक्तीला. किंवा Truecaller ला नाव वेगळे दिसते आणि बँक अकाऊंट वेगळ्याच नावानी असते.
येथून पुढे सिमकार्ड कोणत्याही नावाने असले तरी बँक अकाऊंट ज्या नावाने असेल तेच नाव UPI पेमेंट करायच्या वेळी डिस्प्ले होईल.
7) UPI क्रेडिट लाइन (शिल्लक रक्कम क्रेडिट नुसार मिळवू शकणार)-
UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी बॅंकेत पैसे शिल्लक असणे आवश्यक आहे, आता तुम्ही तुमच्या बॅंकेला रिक्वेस्ट करून शिल्लक रकमेच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकाल.
तुमची बँक तुमचे ट्रॅक रेकॉर्ड व सीबील स्कोर चेक करून ही फॅसिलिटी (ओव्हर ड्राफ्ट/CC सारखी) देईल.
8) New UPI ATM -
यासाठी RBI ने जपान मधील हिताची कंपनी बरोबर कोलॅबरेट केले आहे. लवकरच ही ATM मशीन्स सगळीकडे उपलब्ध होतील. जसे डेबिट/क्रेडिट कार्ड स्वॅप करून ATM मधुन कॅश काढता येते तसेच UPI QR कोड स्कॅन करून कॅश काढता येणार आहे.
9) UPI ट्रान्झ्याक्शन चार्जेस -
जर कोणी UPI क्रेडिट लिमिट वापरुन किंवा क्रेडिट कार्ड द्वारे UPI व्हॅलेट मध्ये पैसे जमा केले असतिल (आत्ता फक्त Paytm ला ही फॅसिलिटी उपलब्ध आहे) आणि त्यातून UPI पेमेंट केले असेल तर विक्रेत्याला 1.1% सर्विस चार्ज द्यावा लागेल.
अजूनही काही नवीन सर्विसेस प्रस्तावित आहेत, तसेच वरील UPI सर्विसेस च्या Implementing मध्ये येणार्या अडचणींचा अभ्यास करून हे नियम NEFT, RTGS ईत्यादी ऑनलाईन पेमेंट साठी पण लागु करणे विचाराधीन आहे. लवकरच RBI च्या वतीने त्याबद्दल ऑफिशिअल Announcements केल्या जातील.
संदर्भ - 1) RBI Governor's announcements.
2) NPCI Circular regarding this changes.
FAQ About new UPI payment updates
1) What is a Prepaid Payment Instrument (PPI) in UPI?
UPI means digital wallets that allow a person to store money and make real-time payments online. Wallets, smart cards, preloaded gift cards, vouchers and magnetised chips also come under PPIs.
2) what is settlement time in UPI payment in 2024?
Ans:- as new guidelines by NPCI IF SOMEONE PAYMENT IS MORE THAN 2000 IT WILL BE TAKE 4 HOURS TO SETTLEMENT.
3) what is a upi payment limit in 2024?
Ans :- reserve Bank of India announce new guidelines for upi payments. Daily limit of upi payment transaction is rs 100000.
4) is there upi transaction cancel option in UPI wallet?
Ans :- NPCI announce new guidelines about upi payment method in 2024. If someone transferred more than 2000 rupees via upi wallet apps it will be take 4 hours to settlement. In this time period if you realise that you have got a fraud then that person can cancel its transaction within 4 hours of settlement time.
जर आपणास सदरचा लेख आवडला असेल ही पोस्ट पुढे पाठवण्याची विसरू नका कारण की सध्याचे युगामध्ये ऑनलाईन सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सदाची पोस्ट शेअर करून तुम्ही भारतातील नागरिकांना जागृत करू शकता.
ऑनलाइन गुन्हेगारीला रोखण्यासाठी सदरची पोस्ट पुढे फॉरवर्ड करा.

No comments:
Post a Comment
Thanks For Comment