फक्त 8 वी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये भरती 2022 | India Post Bharti 2022
India Post office Recruitment 2022:
भारतीय डाक विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याकरता इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविले जात आहेत.
फक्त आठवी पास असलेला उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतो. जर आपण सदर भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असाल तर बातमी सविस्तर वाचावी.
विभागाचे नाव:- भारतीय डाक विभाग
एकूण पदसंख्या:- ०५ जागांसाठी भरती
- मेकॅनिक ०२ जागा
- इलेक्ट्रिशियन ०१ जागा
- पेंटर ०१ जागा
- फायरमन ०१ जागा
वेतन :- उमेदवार नियुक्ती झाल्यास १९९०० ते ६३२०० पर्यंत पगार राहील.
शिक्षण पात्रता:-
- पद क्रमांक ०१ करिता मेकॅनिक या पदासाठी संबंधित उमेदवाराकडे कोणतेही वाहनाची चाचणी घेण्यासाठी हेवी मोटर वेहिकल (HMV) ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे
- इतर पदांसाठी फक्त आठवी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये एका वर्षाचा अनुभव किंवा सरकार मान्य कोणत्याही संस्थेकडून संबंधित ट्रेड मधील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:- एक जुलै 2012 रोजी 18 ते 30 वर्ष
निवड प्रक्रिया:- सदर भक्तीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवाराची कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे त्यामध्ये संबंधित ट्रेड साठी तुमचा फॉर्म भरला असेल त्या ट्रेड विषयीची चाचणी आणि काही सिल्याबस त्या ठिकाणी असेल त्यानंतर त्यानुसार परीक्षा तारीख आणि ठिकाण तुम्हाला कळवले जाईल. सदर परीक्षेसाठी हॉल तिकीट मिळेल त्यानुसार आपल्याला परीक्षा द्यायची आहे.
हे सुध्दा वाचा:-राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वीच 21 तारखेला होणार! | Advance Salary in October 2022 Government GR update
अर्ज पद्धत:- सदर भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत.
परीक्षा फी:- जनरल /ओबीसी/ ई.डब्ल्यू.एस. यांच्याकरता १००/- रुपये आणि SC/ST/महिलावर्ग यांच्यासाठी फी नाही
सूचना: फी भरण्यासाठी पोस्टल ऑर्डर काढावी लागेल याची उमेदवारी नोंद घ्यावी.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
- उमेदवाराचे आधार कार्ड
- उमेदवाराची जातीचा दाखला
- फोटो ई-मेल आयडी
- संबंधित ट्रेननुसार अनुभव सर्टिफिकेट
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- तांत्रिक शिक्षण प्रमाणपत्र
- HMV ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक एक पदासाठी
शेवटची तारीख:- 19 ऑक्टोंबर 2022 पर्यंत
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment