महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांच्याकरिता दिवाळीपूर्वी महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 01 जुलै 2021 पासून थकबाकी देण्याचे आदेश!
7th Pay Commission GR Update:
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेले महात्मा फुले मागासवर्ग विकास मंडळाच्या आस्थापणे वरील नियमित कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोग लागू करणे बाबतचा आज दिनांक 11 ऑक्टोंबर 22 रोजीचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय आहे.
महाराष्ट्र महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांच्या करता दिवाळीपूर्वी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2022 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांना दिनांक 01/07/2021 पासून सातवा वेतन आयोग नुसार सुधारित वेतनश्रेणी अन्वये शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे नियम आणि अटींना अजून लावून आज रोजी 11 ऑक्टोंबर 2022 रोजी सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे.
सदरचा सातवा वेतन आयोग लागू करणेबाबत शासन निर्णय देताना दिनांक 30 जानेवारी 2019 तसेच दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे जे शासन निर्णय निर्गमित झाले होते त्याच्या अधीन राहून स्वतःचा सुधारित वेतन श्रेणी लावण्याचा व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना दिनांक 01 जुलै 2021 पासून सुधारित वेतनश्रेणीनुसार सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतच्या या निर्णयामुळे दिनांक 01 जुलै 2021 पासून ते सुधारित वेतनश्रेणी लागू करेपर्यंतच्या कालावधी थकबाकी ही एकरकमी अदा करणे बाबत सुद्धा निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
- Important महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम/ बोनस/ वेतन/ पेन्शन मिळणार
- शेवटी या राज्य कर्मचारी यांच्या वारस दारांना मिळणार 25 लाख पर्यन्त लाभ शासन निर्णय निर्गमित 12.10.20222
Latest Update: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणेच 60 वर्ष होणार! Retiredment Age 60 year Update
0 Comments
Thanks For Comment