सुप्रीम कोर्टाचा EWS आरक्षणावर ऐतिहासिक निर्णय ! EWS आरक्षण वैध असल्याचा निर्णय...
Hon. Supreme court judgement on EWS reservation: केंद्र सरकारने देशभरातील सवर्ण प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना आरक्षणाची तरतूद करण्यासाठी 103 वी घटनादुरुस्ती केली होती. तेव्हा या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने सदरचे ई.डब्ल्यू.एस. EWS आरक्षण हे वैध असल्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
माननीय सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे सदरची आरक्षण कायम राहणार असून यामुळे सुवर्ण प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील लाभार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
माननीय सुप्रीम कोर्टाने बाबतचा EWS आरक्षण बाबतचा हा ऐतिहासिक निर्णय मानल्या जात आहे. या आरक्षणाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टातील पाच न्यायमूर्ती पैकी चार न्यायाधीशांनी EWS आरक्षण च्या बाजूने निर्णय दिला असून तो वैध असले बाबत निर्णय दिलेला आहे.
EWS आरक्षण नेमकं काय प्रकरण आहे?
केंद्र सरकारने सन 2019 मध्ये राज्यघटनेची 103 वी दुरुस्ती करून आर्थिक आणि दुर्बल घटकांना नोकरी आणि प्रवेशांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. परंतु या घटना दुरुस्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडताना सांगितले की सदरच्या EWS आरक्षणामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांना नोकरी आणि प्रवेशांमध्ये आरक्षणाची तरतूद करून या दुर्बल घटकातील कोणावरही अन्याय होऊ नये. सदरच्या घटकांना या आरक्षणाच्या मार्फत लाभ देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने कोर्टात मांडलेली बाजू काय?
उच्च शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना समान संधी मिळण्यासाठी सदरची घटना दुरुस्ती करण्यात आली, असे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले.
माननीय सुप्रीम कोर्टाने EWS आरक्षण बाबतचा महत्वपूर्ण निकाल देताना सांगितले की, सदरचे ई डब्ल्यू एस आरक्षण हे वैध असले बाबतचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे संबंधित घटकाच्या समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Read Also: How to Increase Cibil Score: तुमचा सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग!
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
No comments:
Post a Comment
Thanks For Comment