Credit Card l क्रेडिट कार्ड Limit वाढवायचयं? तर या टिप्स फॉलो करा

Credit Card | क्रेडिट कार्ड Limit वाढवायचयं? तर या टिप्स फॉलो करा

Credit card limit increase in 5 minute, credit card, Bank personal loan instant,

  आजकाल क्रिकेट कार्ड वापरण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे परंतु बँके मधून क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आपला सिबिल स्कोर हा 700 ते 750 असणे गरजेचे आहे परंतु नागरिकांना क्रेडिट कार्डची लिमिट कित्येक दिवस वाढत नाही तेव्हा क्रेडिट कार्ड ची लिमिट कशी वाढवायची याबाबत टिप्स तुम्हाला या लेखात मिळतील.

क्रेडिट कार्ड ची लिमिट वाढवण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा:

१) तुमचे क्रेडिट कार्ड  Credit Card वापरा:

  • क्रेडिट कार्डची लिमिट वाढवण्यासाठी महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्ड नियमितपणे वापरले पाहिजे.
  • तसेच तुमचे बिल पूर्ण आणि वेळेवर भरले पाहिजे.
  • क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यासाठी क्रेडिट कार्डचा योग्य वापर झाला पाहिजे.
  • क्रेडिट कार्ड वरून केलेली खरेदी आणि त्याची ईएमआय वेळेवर भरले पाहिजे त्यामुळे तुमचा क्रेडिट कार्ड स्कोर आणि क्रेडिट कार्ड लिमिट आपोआपच वाढेल.

२) Credit Card क्रेडिट मर्यादा वाढवण्याची बँकेमध्ये विनंती करा :

 जर तुम्ही क्रेडिट कार्डचा नियमित वापर करत असाल आणि बिल वेळेवर भरत असाल तर तुम्ही तुमच्या बँकेला तुमचा क्रेडिट कार्ड ची लिमट वाढवण्याची विनंती करू शकता.

३) Credit Card | क्रेडिट स्कोर चांगला ठेवा :

  •  तुम्ही क्रेडिट कार्डचा नियमित वापर करता तेव्हा री पेमेंट हे वेळेवर करा त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर चांगला राहील.
  • दिलेल्या वेळेत आधी पेमेंट न करणे हे क्रेडिट स्कोर कमी करण्याचे महत्त्वाचे कारण आहे त्यामुळे वेळेवर पेमेंट करा त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर सुद्धा चांगला राहील.
  • क्रेडिट कार्ड ॲप मध्ये तुम्हाला तुमची ड्यू डेट समजेल त्या डेटच्या अनुसरून तुम्ही आपली रक्कम भरणा करायचा आहे.
  • क्रेडिट कार्ड EMI न चुकता वेळेवर भरा.

४) Credit Card | क्रेडिट कार्ड व्याजदर लक्षात ठेवा:

    आपण क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी क्रेडिट कार्ड चे सर्व नियम समजून घ्यावे. Credit Card कार्ड  चे व्याजदर हे चक्रवाढ व्याज प्रमाणे असते. Compound interest म्हणजे जर तुम्ही एखाद्या महिन्यामध्ये तुमचा हप्ता किंवा बिल देयक थकवले असेल आणि ते वेळेवर भरले नसेल पहिल्या महिन्यामध्ये जे तुम्हाला व्याज लागेल ठीक आहे तुमच्या बिलामध्ये जोडून येईल. समोरच्या महिन्यामध्ये मूळ बिल आणि मागच्या महिन्याचे व्याज या रकमेवर परत व्याज लागेल म्हणजेच चक्रवाढ व्याज प्रमाणे क्रेडिट कार्डचे व्याजदर असतात. तेव्हा क्रेडिट कार्डचा जपून आणि योग्य वापर करा अन्यथा तुम्हाला कर्जबाजारी केल्याशिवाय सोडणार नाही.

How to check your credit score on mobile?

   तुमचा क्रेडिट स्कोर तपासात असेल तर तुम्ही खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा क्रेडिट स्कोर तपासू शकता. 

बँकेमधून पर्सनल लोन , होम लोन, बिझनेस लोन करिता ग्राहकाचा सिबिल स्कोर हा तपासला जातो त्यानंतरच त्यांना लोन दिल्या जाते. तेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करताना सर्व नियम व अटी माहिती करूनच वापर करावा.
अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सौजन्य:- बीबीसी न्यूज नेटवर्क
ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी


Post a Comment

0 Comments

close