फक्त याच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन चा मिळणार लाभ ! Old Pension Scheme Update

फक्त तेच सरकारी कर्मचारी खुश; यांनाच जुनी पेन्शनचा मिळणार लाभ!

Maharashtra cabinet old pension scheme

Old Pension Scheme:-

   जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी यांनी आंदोलने केले व शासकीय सेवेतील सर्वच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांची होती. दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णय नुसार ..
  • जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक ियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची नियुक्ती प्राधिकार्‍याकडे सादर करायचा आहे.
  • हा कर्मचारी पात्र ठरला असेल तर तशा पद्धतीने कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकार्‍याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत द्यावी.
  • त्याचप्रमाणे संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन पेन्शन योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाईल.
  • तसेच त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात येईल आणि सदर खात्यात नवीन पेन्शनच्या हिश्याची रक्कम याचा सहज जमा करण्यात येईल.

फक्त ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांना लाभ:-

  ग .दि. कुलथे मुख्य सल्लागार राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या मते शासकीय सेवेतील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होती परंतु मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा राज्यातील केवळ चार ते पाच हजार कर्मचारी व अधिकारी यांना होणार आहे असे म्हटले आहे.
 हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये सरकारी कर्मचारी आणि नागपूरमध्ये मोर्चा काढला त्यामध्ये सन 2005 पासून राज्यात नवीन पेन्शन योजना लागू झाली. व त्यामुळे 2005 नंतर शासकीय सेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही बंद झाली तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांना सळसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आले ते आपण खालील पीडीएफ मधून डाउनलोड करू शकता.
📢
महत्वाची सूचना..

(जुनी पेन्शन च्या निर्णया संदर्भात स्पष्टीकरण..)

जुन्या पेन्शन बाबत मीडियावर प्रसारित होणाऱ्या बातम्या अपुऱ्या माहितीने प्रसारित केल्या जात आहे...

आज जुन्या पेन्शन बाबत घेण्यात आलेला निर्णय हा केवळ 
*१ नोव्हें २००५ पूर्वी नोकरीची जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.. जे कर्मचारी 1 नोव्हें २००५ पूर्वी च्या जाहिरात मध्ये समाविष्ट होते मात्र नोकरीत 2005 नंतर रुजू झाले , त्याच शासकीय कर्मचाऱ्यांनाच जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे..* इतर 99% कर्मचाऱ्यांना अद्यापही नवीन पेन्शन योजना च लागू आहे..
आजचा शासनाने घेतलेला सदर निर्णय हा माननीय मुंबई , औरंगाबाद,नागपूर इत्यादी उच्च न्यायालय खडपीठात दाखल याचिकांवर कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय लागल्यामुळे सरकार ला अश्या सर्व 2005 पूर्वीच्या जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घ्यावा लागला आहे.. सदर असा निर्णय यापूर्वी केंद्राने 2 वर्षांपूर्वी घेतलेला आहे..

जुनी पेन्शन लागू झालेल्या या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन , पण संघर्ष अजून संपलेला नाही..
_*एकच मिशन जुनी पेन्शन*_
माहितीस्तव..
_*राज्य सोशल मीडिया टीम*_
_*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*_
मित्रांनो अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट साठी आमचा खाली व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सौजन्य:- लोकमत न्यूज नेटवर्क

No comments:

Post a Comment

Thanks For Comment