केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना, दिवाळी आधीच 38% प्रमाणे महागाई भत्ता !

राज्य कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी DA गिफ्ट! | राज्य सरकारी कर्मचारी DA 04% वाढ होणार !

महागाई भत्ता,महागाई भत्ता 38%,महागाई भत्ता शासन निर्णय,राज्य शासकीय कर्मचारी,

Dearness Allowance 04%  Increase:

             केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी यांना त्याचप्रमाणे केंद्रीय निवृत्तीवेतनधारक कर्मचारी यांना माहे जुलै 2022 पासून महागाई भत्ता 4% टक्क्यांनी वाढीव लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार 38 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे तसेच केंद्र शासनाच्या या निर्णयानुसार राज्य कर्मचारी यांना सुद्धा देअरनेस अलाउन्स DA मध्ये वाढ व्हायला पाहिजे.
       ज्याप्रमाणे केंद्रीय कर्मचारी यांना 04% DA करण्यात आली आहे त्याचप्रमाणे राज्य शासन कर्मचारी यांना देखील DA मध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शवल्या जात आहे. 
    राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ महाराष्ट्र यांनी राज्य शासनास निवेदन सादर केले आहे की, ज्याप्रमाणे केंद्रीय कर्मचारी यांना DA वाढ केली आहे त्याचप्रमाणे राज्य कर्मचारी यांना सुद्धा DA वाढ होणे अपेक्षित आहे असे निवेदन स्पष्ट नमूद केले आहे.
              त्यामुळे दिवाळी पूर्वी राज्य शासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून केंद्र शासनाप्रमाणेच 04 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात यावा.  सदरची मागणी पूर्ण न झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात येणार आहे असे निवेदनात नमूद केले आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या या निवेदनामुळे राज्य शासनाला लवकरच DA वाढ बाबत सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.
           महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांनी 2 ऑक्टोंबर रोजी जुनी पेन्शन मिळणे बाबत आंदोलन आयोजित केले असल्याचे समजत आहे त्यानुसार सरकारला जुनी पेन्शन मिळणे बाबत तसेच केंद्र शासनाप्रमाणे वाढीव महागाई भत्ता मिळणे बाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे.
    जुलै 2022 पासून 04% DA वाढ करून शासनाला राज्य कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी गिफ्ट देण्याची शक्यता आहे त्यामुळे जर 04 % DA वाढ सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यास एकूण DA 38% टक्के होईल. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच DA वाढीचे गिफ्ट मिळणे शक्यता आहे.

सदरची माहिती आपणास आवडली असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेट आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळवा धन्यवाद!

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment