Online फसवणुकीला आळा बसणार! सरकार अंनतय नवीन नियम, आता सर्वांचे फोन नंबर होणार...

Online फसवणुकीला आळा बसणार! सरकार अंनतय नवीन नियम, आता सर्वांचे फोन नंबर होणार...

TRAI New Rules for customer
TRAI New Rules:- सध्या ऑनलाईन फसवणुकी चे वाढते प्रमाण पाहून सरकारने मोबाईल कॉलिंग मध्ये मोठे बदल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मोबाईल कॉलिंग मुळे ऑनलाइन फसवणुक वाढली आहे. फसवणूक करणारे हे बनावट नंबर वापरून कॉल करतात त्यामुळे अशा नंबर्स ना आळा बसण्यासाठी शासनाने नवीन नियमावली तयार केली आहे. TRAI (Telecom Regulatory Authority of India) ट्रायच्या नवीन नियमावलीनुसार मोबाईल फोनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसणार आहे.
सदरच्या निर्णयामुळे कॉलिंग करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसल्यामुळे कॉलिंग करणारा व्यक्ती हा आपल्या परिचयाचा आहे किंवा नाही हे कळण्यास मदत होईल. यामुळे बनावट नंबर चा वापर करून फसवणाऱ्यांना आळा बसेल.
 सरकार ट्राई (TRAI) सोबत नवीन नियमावली तयार करत आहे आणि लवकरच ही लागू होणार आहे.

ही कार्यप्रणाली कशी असेल?  Sim card वर आधारित प्रणाली

सरकार काय सोबत नवीन प्रणाली सुरू करणार आहे त्यामध्ये कॉल करणाऱ्याच्या मोबाईल नंबर सह त्याचा फोटो सुद्धा दिसणार आहे. सदरचे प्रणाली ही व्यक्तीच्या आधार कार्ड आणि सिम कार्ड नंबर यावर आधारित राहणार आहे.
सदरची प्रणाली केवायसीवर (KYC) आधारित राहणार आहे मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना केलेल्या केवायसी च्या नुसार सिम कार्ड धारकाचे नाव आणि फोटो हा ज्याला कॉल केला आहे त्याला दिसणार आहे.

CAF (customer application form) वापर होणार!

प्रत्येक व्यक्तीला नवीन सिमकार्ड घेण्यासाठी टेलिकॉम कंपनी आहे सदर व्यक्तीचे CAF आपलिकेशन भरून घेत असते त्यामध्ये मोबाईल नंबर वापरकर्त्याचे आधार कार्ड लिंक केलेले असते. वापरकर्त्याच्या आधार कार्ड ची माहिती नुसार मोबाईल कॉलिंग करणाऱ्या व्यक्तीचे नाव दाखवले जाणार आहे.

काय फायदा होणार:

TRAI ट्रायच्या च्या या नवीन प्रणाली मुळे कॉल रिसीव करणाऱ्या व्यक्तीला समजेल की त्याला कोणी कॉल केलेला आहे तो त्याच्या ओळखीचा आहे किंवा नाही. कारण कॉलिंग करण्याची संपूर्ण नाव आणि फोटो त्याला दिसणार आहे.
मुख्य उद्देश हा आहे की ऑनलाईन फसवणुकीला आळा बसवणे!

True caller ला टक्कर:

  सध्या बहुतेक नागरिक हे ट्रू कॉलरचा वापर करत आहेत परंतु यामध्ये सत्य माहिती दाखवले जात नाही जो यूजर एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर प्रथमतः जी माहिती समाविष्ट करतो तीच माहिती ही वापर करताना दाखवली जाते. किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जे नाव वापरले आहे तेच नाव दाखवले जाते. त्यामुळे कॉल रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीला खरी माहिती मिळत नाही. परंतु सरकारच्या या नवीन नियमामुळे कॉल रिसीव करणाऱ्या व्यक्तीला केवायसी वर आधारित असलेले नाव दिसणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सध्या होत असलेल्या ऑनलाईन फसवणूक आळा बसवणे हा आहे.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट साठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा


No comments:

Post a Comment

Thanks For Comment