ISRO इस्रो देणार तुमच्या मुलांना मोफत शिक्षणाची संधी; आजच अर्ज करा!

ISRO इस्रो देणार तुमच्या मुलांना मोफत शिक्षणाची संधी; आजच अर्ज करा! ISRO: Students Will Get Free Education; Apply Today

ISRO Antriksh Jigyasa scheme 2023
शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि पृथ्वी आणि त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर याची माहिती देणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट आहे.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ISRO होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

कोणत्या वर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात?

  • इयत्ता ८ वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स शिकण्याची इच्छा आहे आणि विज्ञान आणि गणिताची मूलभूत माहिती आहे, असे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. 

अभ्यासक्रम कसा असेल?

  • इस्रोच्या स्पेस क्युरिओसिटी (space 🚀 security) चा उपक्रमाचा एक भाग म्हणून हा अभ्यासक्रम दिला जातो. त्याचप्रमाणे NCERT च्या अभ्यासक्रमानुसार रिमोट सेन्सिंग(remote Sensing) तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील.

शिकवणी वर्ग कोण घेणार?

  • यामध्ये शिकवणी वर्ग कोण घेणार? तर इस्रोच्या विविध केंद्रातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक हे वर्ग घेणार आहेत. (ISRO Antriksh Jigyasa)
शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि पृथ्वी आणि त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर याची माहिती देणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट आहे.
इस्रो मार्फत घेण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी भाषा वापरून त्यामध्ये चित्र आणि ॲनिमेशन चा वापर करून अभ्यास करा पूर्ण केला  जाणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये रिमोट सेन्सिंग तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच (ई एम आर EMR) , सूर्य समकालीन उपग्रह तसेच जिओ स्टेशनरी आणि रिमोट सेंसर चे विविध प्रकार व मल्टीस्पेक्टर स्कॅनर या विषयांचा सुद्धा यामध्ये समावेश असेल.
अर्ज कोठे आणि कसा करायचा?
  • इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी jigyasa.iirs या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. 
  • या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल ती तुम्ही तिथे भरायचे आहे.
  • बरोबरच शाळेचा तपशील सुद्धा या ठिकाणी भरायचा आहे नंतर त्या ठिकाणी तुमची निवड झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख व अभ्यासक्रम तुम्हाला ईमेल मार्फत कळविण्यात येणार आहे.
ज्या पालकांना इसरो बाबत काहीच कल्पना नाही अशा पालकांना समोरील लिंक करून विसरू बद्दल सविस्तर माहिती घ्यावी.
आता सामान्य पालकांना (ISRO) इस्रो बद्दल माहिती करून देऊया!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे.[२] फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'इस्रो'ने (Indian Space Research Organisation-(ISRO)चे लघु रूप), तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने, भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले.[३] इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment