आता नोकर भरतीची जबादारी IBPS कडे! ZP recruitment 2023

 आता नोकर भरतीची जबादारी IBPS कडे! तसेच पदभरतीतील विविध परीक्षांसाठी परीक्षा शुल्क निश्चित वाचा सविस्तर...

ZP recruitment 2023,

IBPS ZP RECRUITMENT 2023: जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीला गती मिळाली आहे. यापूर्वी नोकर भरतीसाठी टीसीएस कंपनीची निवड केली होती.
मात्र, कमी वेळेत ही भरती 'टीसीएस'कडून होणे शक्य नसल्याने आता IBPS आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे. जिल्हा परिषदेने नुकताच आयबीपीएस कंपनीशी करार केला. एकूण ७७४ जागांसाठी ही भरती होणार असून, पुढील महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने नोकरभरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्व विभागांनी रिक्त जागांची संख्या शासनाकडे कळवली. यानंतर शासनाने जिल्हास्तरावरच नोकरभरतीची विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत आणि प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले.

त्यानुसार जिल्हास्तरावरच विभागीय परीक्षा जाहीर झाल्यानंतर आयबीपीएस कंपनी मार्फत सदरच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.

बरेच दिवसापासून नोकर भरतीची मार्केटिंग सुरू आहे परंतु शासनाने पोलीस भरती शिवाय इतर कोणतीही जाहिरात प्रकाशित केलेली नाही आता या बातमीवरून असे लक्षात येते की शासनाने नोकर भरतीच्या प्रक्रियेला वेग दिला आहे.

 नोकर भरतीसाठी शासनाने काही कंपन्या निश्चित केल्या आहेत. यात जिल्हा परिषदेने पहिल्यांदा टीसीएस कंपनीकडे नोकर भरतीचे काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंपनीकडे बरेच काम असल्याने त्यांच्याकडून वेळेत काम होण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या निर्णयात बदल करून आता हे काम आयबीपीएस कंपनीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कराराची प्रक्रियाही झाली आहे.

जिल्हा परिषदेकडील विविध २० पदांच्या ७७४ जागा रिक्त आहेत. यात कनिष्ठ लेखाधिकारी, अभियंत्यांपर्यंतच्या जागांचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे हजारो उमेदवार परीक्षेची वाट पाहत आहेत. जिल्हा परिषदेने रिक्त सर्व जागांची पडताळणी करून यादी तयार केली. यानुसार आता कंपनीकडून परीक्षेचे आयोजन केले जाईल. परीक्षा केंद्राची निवड, पेपर यापासून ते निकाल तयार करून गुणवत्ता यादी देण्यापर्यंतची जबाबदारी कंपनीची राहील. केवळ निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्याची जबाबदारी फक्त जिल्हा परिषदकडे राहणार आहे.

सौजन्य: सकाळ न्यूज नेवर्क 

पदभरतीतील विविध परीक्षांसाठी परीक्षा शुल्क निश्चित

• भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी टीसीएस- आयओएन आणि आयबीपीएस या दोन नामांकित कंपन्यांची निवड

  • राज्यातील 75,000 पदभरतीच्या प्रक्रियेत आता एकच परीक्षा शुल्क
  • 1000 रुपये परीक्षा शुल्क, राखीव प्रवर्गांना 10 टक्के सवलत

Ibps exam's fees

अशाच प्रकारच्या लेटेस्ट शासकीय कर्मचारी विषयक शासन निर्णय तसेच जीआर करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈

सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.  

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close