मेस्मा कायदा म्हणजे काय? तो कधी लागू होतो? कोणावर लागू होतो? What is Mesma?
Maharashtra employees strike for old pension scheme: संप करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची तरतुद; मेस्मा कायदा घाईत मंजूर
जुन्या पेंशनसाठी संप सुरु असतानाच मेस्मा कायदा विधानसभेत मंजूर करण्यात आला असून संपकऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी 14 मार्च 2023 पासून राज्य सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे सरकारी कार्यालय कामकाज ठप्प झालेले आहे.
तेव्हा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाने मेस्मा कायद्यासंदर्भात विधेयक 14 मार्च 2023 रोजी मंजूर केले या कायद्याची मुदत 28 फेब्रुवारी 2023 रोजी संपली होती. त्यामुळे राज्यात 28 फेब्रुवारी नंतर मेस्मा कायदाच अस्तित्वात नव्हता आणि या कालावधीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर या कायद्याची पुन्हा स्थापना महाराष्ट्र राज्य सरकार करणार असून त्यामुळे सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत त्यांच्यावर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
- संप सुरु असतानाच 'मेस्मा कायदा' चर्चेविनाच विधानसभेत बहुमताने मंजूर, संपकऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याची तरतूद आहे.
आता मेस्मा कायदा म्हणजे काय? तो कधी लागू केला जातो? आणि कोणावर लागू होतो? आणि त्याची शिक्षा काय आहे? What is mesma act?
- केंद्र सरकारने या प्रकारचा कायदा the essential services maintenance act 1968 मध्ये मंजूर केलेला आहे.
- मेस्मा कायद्याचं पूर्ण नाव आहे" द महाराष्ट्र इसेन्सिअल सर्विसेस मेंटेनन्स अॅक्ट 2011"
- मेस्मा कायदा हा संपूर्ण महाराष्ट्र राज्य साठी लागू आहे.
- Mesma ACT pdf येथे पहा
मेस्मा कायद्यामध्ये कोणत्या सर्विसेस येतात? What is the full form of Mesma Act?
- Essential services सर्विसेस मध्ये जल आणि भूमीवरून होणाऱ्या प्रवासी आणि वाहतूक ज्याच्याबद्दल राज्य सरकार कायदा करू शकते अशा सर्व बाबी.
- कोणतीही सार्वजनिक सेवा तसेच राज्याशी संबंधित पोस्ट आणि रोजगार सेवा त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सेवा.
- गॅस पाणी वीज दूध यासारख्या त्या आवश्यक सेवा संबंधित बाबी.
- उच्च न्यायालयातील अधिकारी कर्मचारी तसेच दोन्ही सभागृहामधील सेक्रेटरी स्टाफ आणि स्थानिक व्यवस्था संबंधित असणाऱ्या सेवा या सर्वांचा समावेश यामध्ये होतो.
- जुनी पेन्शन नाही.. तर NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी 14 मार्च 23 शासन निर्णय निर्गमित ....!
- Old pension strike ! अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात..
मेस्मा कायद्यात ची व्याख्या काय आहे? What is the definition of Mesma act?
- मेस्मा कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांच्या समूहाने आपल्या सेवेत किंवा कामाला नकार देणे.
- आणि यामध्ये एखाद्या सेवेत आवश्यक असताना ओवर टाईम करायला नकार देणार याचा सुद्धा समावेश आहे. (Maharashtra Essential Services Maintenance Act, 2017)
मेस्मा कायद्याचं उल्लंघन झालं तर? What is the punishment in Mesma act?
- कायद्याने बेकायदेशीर ठरवल्या संपामध्ये ज्या कर्मचारी व्यक्तीने सहभाग घेतला आहे त्यांना 01 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो.
- त्याचप्रमाणे दोन हजार रुपयांपर्यंत दंड सुद्धा केला जाऊ शकतो.
- किंवा वरील दोन्हीही शिक्षा संबंधित व्यक्तीला होऊ शकतात.
- बेकायदेशी संप पुढे चालू ठेवण्यासाठी जी व्यक्ती खर्च करतो किंवा पैसा पुरवतो त्यांना सुद्धा समान शिक्षा आहे.
👉👉आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? MLA Salary ?
- ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार वाढला! सरकारचा मोठा निर्णय | Grampanchayat Staff Salary increase 2022
- Important: महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम/ बोनस/ वेतन/ पेन्शन मिळणार | Diwali Bonus-advance with Salary
- Read Also : राशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज बोनस मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Ration Card Holders Diwali Package Gift
👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच वेतन/मानधन येथे तपासा 👈👈👈👈
सदरचा लेख आपणास आवडला असल्यास समोर नक्की पाठवा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment