या सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्यामध्ये दरमहा 5,000/- रुपयांची वाढ! - मंत्रीमंडळ निर्णय

या सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्यामध्ये दरमहा 5,000/- रुपयांची वाढ! - मंत्रीमंडळ निर्णय

महाराष्ट्र कर्मचारी शासन निर्णय:-

महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील पुढे दिलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला ठोक भत्ता देण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी याच महिन्यापासून करण्यात येणार आहे तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या भक्तांमध्ये ०५ हजार रुपयांची वाढ होणार आहे. सविस्तर बातमी पुढे वाचा..

  • राज्याच्या मंत्रालयीन विभागातील “लिपिक टंकलेखकांना” दरमहा 5,000/- रुपये ठोक भत्ता ( Thok Allowance ) देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे.
  •  दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.
  • सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 
मंत्रालयीन स्तरावर इतर कामाच्या तुलनेमध्ये लिपिक टंकलेखकांचे कामाचे स्वरूप अधिक मोठे आहे. त्यामुळे मंत्रालयाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन ठोक भत्ता देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 मंत्रालयीन निर्णयामुळे तब्बल 11 कोटी 34 लाख 60 हजार रुपये एवढ्या खर्चा स मान्यता देण्यात आलेली आहे.
 मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये लिपिक संकलेखाची संख्या सध्या 1891 एवढी आहे या सर्व कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे ज्याला ठोक भत्ता म्हणून संबोधले आहे.

भत्ता वाढवण्याचे कारण:

  • महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये जे नवीन लिपिक टंकलेखक पदावर नियुक्त झालेले आहेत हे कर्मचारी यांनी महागडी निवासी अवस्था आणि जिकिरच्या प्रवासामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तसेच उपनगरात भाडेतत्त्वांवर घरी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे हे कर्मचारी अल्पावधीमध्येच सेवा सोडून जात असल्याचे प्रमाण वाढले असल्याने हा निर्णय घेतला आहे.
अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सौजन्य:- बीबीसी न्यूज नेटवर्क
ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

No comments:

Post a Comment

Thanks For Comment