01 डिसेंबर पासुन भारतात डिजिटल रूपयाला सुरुवात?!How To use CBDC Digital currency

01 डिसेंबर पासुन भारतात डिजिटल रूपयाला सुरुवात! How to use CBDC Digital currency in India?

Digital currency activated in India

Digital currency in India:-

   आपण सर्वजण सध्या आर्थिक चलनामध्ये कागदी नोटा, नाणी, धनादेश, तसेच चेक इत्यादी वापर करत असतो. सर्वप्रथम पैसा म्हणजे काय? याची आपण व्याख्या पाहिली तर पैसा म्हणजे फक्त विनिमयाचे माध्यम म्हणून त्याची व्याख्या करण्यात येते. म्हणजे ज्या वस्तूला किंवा धातूला किंवा कागदाला विनिमयाचे माध्यम म्हणून मान्यता देऊन त्याद्वारे व्यवहार केले जातात त्याला विनिमयाचे माध्यम असे म्हटले जाते आणि आपण त्याला पैसा असे संबोधतो. 
उदाहरणार्थ:- एखाद्या दुकानांमध्ये चहा घेताना आपण प्लास्टिकचे टोकन घेऊन चहा घेतो. किंवा एक दूधवाला देखील त्याच्या नावाची टोकन छापून देणाऱ्याला आणि घेणाऱ्या त्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होता व्यवहार करतो त्याला चलन म्हणून वापरली जाते. आता या प्लास्टिक टोकन ला भारत सरकारच्या आरबीआयच्या मान्यतेची आवश्यकता नसते. तरीही त्याचा चलन म्हणून वापर केला जातो. यावरून तुम्हाला पैशाची व्याख्या नक्कीच समजली असेल.

आता डिजिटल करन्सी म्हणजे काय? What is digital currency investment?

       इन्वेस्ट ऑफ इंडियाच्या मध्ये डिजिटल चलने ही अशी मालमत्ता आहे जी केवळ इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी वापरली जाते त्यांच्याकडे कोणतेही भौतिक स्वरूप नाही जरी ते नियमित पैसे किंवा इतर मालमत्तेसाठी एक्सचेंज केले जाऊ शकतात.

Digital currency investment 

    म्हणजेच की डिजिटल चलन हे एक इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील चलन आहे याचा वापर करून आपण कागदी नोटांप्रमाणेच व्यवहार करू शकतो. या डिझेल चलनाची नेमकी मूल्य, नॉमिनल व्हॅल्यू सुद्धा असेल. ज्याप्रमाणे कागदी नोटांवर एक स्वतंत्र क्रमांक तसेच ओळख असते त्याचप्रमाणे त्या चलनाचा मालक कोण आहे याची माहिती सुद्धा असेल. 
    याला क्रिप्टोग्रफिक पद्धतीने बांधले गेलेले असेल. आणि ही सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर पद्धतीने बांधलेली असेल. या डिजिटल चलनाचा प्रवास सुद्धा यामध्ये आपल्याला ट्रेस करता येईल म्हणजेच त्या चलनाचे मालक कोण कोण होते आणि ते कोणापर्यंत पोहोचले हे आपल्याला कळेल. 
    परंतु ही सदरची माहिती डिजिटल चलन जो व्यक्ती बाळगतो त्याला नसेल ती फक्त मध्यवर्ती बँकेकडे किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या संस्थेकडेच असेल.
ज्याप्रमाणे आपण सध्या आर्थिक व्यवहारांमध्ये नोटांचा वापर करतो शिक्क्यांचा वापर करतो त्याचप्रमाणे डिजिटल चलन देखील 01, 02, 05, 10, 20, 50, 100, 1000, 2000 रुपयाचे असे त्याचे मूल्य असेल.

डिजिटल चलनाचे एकूण दोन प्रकार आहेत

  1. रिटेल करन्सी
  2. होलसेल करन्सी
यामध्ये डिजिटल चलन होलसेल आणि रिटेल अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सर्वसामान्य नागरिकांसाठी हे चलन रिटेल करन्सी म्हणून प्राप्त होईल
  • तर जे बँक असतील यांना ते होलसेल प्रकारामध्ये देण्यात येईल 
बँकेमधील एकमेकांमध्ये व्यवहार करण्यासाठी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिजिटल होलसेल चलन वापरतील.

       डिजिटल चलन वापरण्यासाठी आणि त्याचा योग्य प्रकारे विनिमय करण्यासाठी सरकारमार्फत काही सूचना आणि नियमांची सुद्धा अंमलबजावणी केली जाईल. आताही डिझेल करन्सी तुमच्याजवळ तुम्ही कशी बाळगसाल. आणि तुमच्याजवळ या डिजिटल चलनाचा संचय कसा करतात त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा.

मित्रांनो जर आपणास हा लेख आवडला असेल आणि भविष्यामध्ये आपल्याला डिजिटल करन्सी वापरावी लागेल तर त्याची जाणीव असणे आवश्यक आहे त्याकरता आमचा हा छोटासा प्रयत्न जर आपल्याला सदरचा लेख आवडला असेल आपल्या इतर बांधवांना नक्की पाठवा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment