तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आणि कुठे खर्च झाला? पहा एका क्लिकवर

तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आणि कुठे खर्च झाला? पहा मोबाइलवर!

Gram Panchayat fund details report website

Grampanchayat 15 finance Egramswaraj:-

   प्रत्येक गावकर यांना आपल्या गावाचा विकास व्हावा असे वाटत असते. त्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या गावाचा विकास करणारा उमेदवार निवडून आणतात आणि त्यामधून सरपंच सुद्धा निवडतात. आता तुमच्या गावच्या सरपंच हा किती प्रामाणिक आहे आणि त्याने ग्रामपंचायत ला मिळालेला निधी कुठे खर्च केला यावरून समजेल.
  तेव्हा तुमच्या गाव ग्रामपंचायतला एकूण किती निधी मिळाला आणि तो कोठे खर्च झाला? हे पाहिल्यास तुम्हाला तुमच्या गावाचा विकास झाला की नाही हे ठरवता येईल?
  चला तर मग आपण या पोस्टमध्ये बघूया की आपल्या गाव ग्रामपंचायतला आतापर्यंत किती निधी मिळाला? आणि तो निधी कुठे खर्च झाला? दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवर बघा.
प्रत्येक ग्रामपंचायतला 15 वित्त आयोग  मार्फत निधी पुरवला जातो व त्यामधून ग्रामपंचायतीकडे आलेले लाखो रुपये ग्रामपंचायतला गाव विकासासाठी मिळत असतात. तेव्हा पंधराव्या वित्त आयोग ची रक्कम किती प्राप्त झाली आणि कोणत्या कामासाठी खर्च झाली की तुम्ही आपल्या मोबाईल पाहू शकता.
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 28 हजार ग्रामपंचायती असून 15 वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतीच्या खात्यावर लाखो रुपये ग्राम विकासासाठी येत असतात. ग्रामपंचायतला मिळाला निधी हा गावाची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यावर अवलंबून असतो.
ग्रामपंचायत ला मिळणारा निधी हा दोन प्रकारे खर्च केला जातो:
१) पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासाठी एकूण रकमेच्या ६०% टक्के रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे.

2) आणि उरलेला 40 टक्के निधी हा इतर ग्रामपंचायत कामासाठी खर्च केला जातो.
आपल्या गावाचा विकास व्हावा ही अपेक्षा सर्व नागरिकांची असते त्यासाठी शासन विविध योजना मार्फत ग्रामपंचायतला निधी पुरवत असतो. त्यानुसार गावातील ग्रामपंचायत मध्ये सरपंच हे कायदेशीर मार्गाने खर्च करत असतो. आता तुमच्या गावचा सरपंच हा तुमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये मिळालेला निधी योग्य ठिकाणी खर्च करतो की नाही हे तुम्ही खालील लिंक वरून पाहू शकता.
ग्रामस्वराज्य वेबसाईट मार्फत तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील
  • ग्रामपंचायत निधी माहिती ग्रामपंचायत निधी खर्च तपशील
  •  ग्रामपंचायत निधी खर्च माहिती
  • ग्रामपंचायत निधि कुंडली
  • ग्रामपंचायत निधी खर्च,ग्रामपंचायत निधी किती आला
  • ग्रामपंचायत निधी योजना
  • ग्रामपंचायत शिल्लक निधी
  • ग्रामपंचायत निधी संपूर्ण माहिती
  • ग्रामपंचायत वार्षिक निधी पहा
  • ग्रामपंचायत निधी किती आला किती खर्च झाला
अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close