पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार! १५ हजारांची वेतन मर्यादा रद्द केली!

Employee pension scheme: पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार! १५ हजारांची वेतन मर्यादा रद्द केली!

Employee pension scheme latest update

     दिनांक 04 नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने 2014 च्या कर्मचारी पेन्शन योजनेबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सरकारी कर्मचारी पेन्शन योजनेबाबतच्या निकालामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.

employee pension scheme latest updates 2022: 

        पेन्शनबाबत सुप्रीम कोर्टाने नुकताच मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने कर्मचारी पेन्शन (सुधारणा) योजना-२०१४ ची वैधता कायम ठेवली आहे. मात्र १५,००० रुपयांची वेतन मर्यादा रद्द करण्यात आली आहे.

  2014 ची कर्मचारी पेन्शन योजना ही वैध असल्या बाबतचा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. EPFO च्या पेन्शन योजना अंतर्गत सन 2014 च्या दुरुस्तीनुसार , कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 15,000/- रुपये किमान वेतन आवश्यक आहे असा निर्णय देण्यात आला होता. 

👉कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार येथे क्लिक करून वाचा👈👈

परंतु दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन (सुधारणा) योजना-२०१४ ची वैधता कायम ठेवली आहे. मात्र १५००० रुपयांची वेतन मर्यादा रद्द करण्यात आली आहे. २०१४ मध्ये पगार मर्यादा ६००० रुपयांवरून १५००० रुपये करण्यात आली होती.

06 महिने मुदतवाढ मिळाली:

    या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना सहभाग होण्याकरीता आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 06 महिने मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे . त्याचप्रमाणे 2014 च्या कर्मचारी पेन्शन योजनेला कायदेशिर व वैध असल्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे .(supreme court of India employee pension scheme)  

👉👉कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार येथे क्लिक करून वाचा👈👈

नवीन नियम जाणून घ्या:- 

  •   नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांची 06 महिने किंवा त्यापेक्षा अधिक सेवा ही 01 वर्षाची सेवा मानली जाईल. यापेक्षा कमी सेवा असल्यास गणल्या जाणार नाही.
  • जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षे सात महिने काम केले असेल तर ते 11 वर्षे मानले जातील.
  • ईपीएस अंतर्गत कमीत कमी पेन्शन एक हजार रुपये प्रति महिना आहे तर जास्तीत जास्त 7500 हजार रुपये आहे.

असे करा कॅल्क्युलेशन:

      जर १५ हजारांची मर्यादा काढून टाकली आणि तुमचा मूळ पगार २० हजार रुपये असेल, तर तुम्हाला (२०००० x ३०) / ७० = ८५७१ रुपये या सूत्रानुसार पेन्शन मिळेल.

अशाच प्रकारच्या सरकारी निर्णय जुनी पेन्शन योजना अपडेट सरकारी योजना आपल्या मोबाईलवर पाहिजे असल्यास आमचे खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


No comments:

Post a Comment

Thanks For Comment