"7 वा च वेतन आयोग" नाही तरी ‘आठव्या’ची चर्चा ! जाणून घ्या, कोणाला काय फायदा होणार?
8th Pay commission: सध्या आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay commission) चर्चा आपल्याला दिसत आहेत. परंतु काही राज्य कर्मचाऱ्यांना अजून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही परंतु आठवा वेतन आयोगाची चर्चांना उधाण आली आहे. तर या पोस्टमध्ये कोणाला किती होणार फायदा आपण याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
केंद्रीय सरकारी कर्मचारी (Central Government employees) च्या विविध संघटनांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा आहेत. परंतु सातवा वेतन आयोग लागू होऊन बराच कालावधी झाला परंतु अनेक शिफारसी लागू न केल्याने विविध संघटना च्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता आठवा वेतन आयोगाची पूर्तता करण्याची मागणी विविध संघटनांमार्फत करण्यात येत आहे त्याबाबत केंद्र सरकारला पत्र व्यवहार देखील करण्यात आलेला आहे.
सध्या सातव्या वेतन आयोगानुसार according to 7th pay commission किमान वेतन हे अठरा हजार रुपये आहे आणि कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर (fitment factor) 2.57 दिला जात आहे. आता हा फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 करण्याची मागणी संघटनांमार्फत करण्यात आलेली आहे.
सरकार सातवा वेतन आयोगानंतर पुढील आठवा आयोग आणणार नाही याबाबत चर्चा आहे. तसेच त्यांच्या बदल्यात शासन अशी योजना आणणार आहे की ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये आपोआप वाढ होणार आहे. तसे झाल्यास 68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख पेन्शन धारक कर्मचारी यांना याचा फायदा होणार आहे.
महत्त्वाचे हे सुद्धा वाचा:-
आठव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी निवेदन तयार आहे तसेच ते केंद्र सरकारला सुद्धा पाठविण्यात येणार आहे. सदरच्या निवेदनामध्ये पगार वाढावा आणि आठवावेतन आयोग अमलात आणावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. परंतु केंद्र सरकारने लोकसभेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी चर्चा केली होती त्यामध्ये आठवा वेतन आयोग लागू करण्यात दिला आहे.
आठवा वेतन आयोग लागू करणे बाबत च्या निर्णयावर स्पष्ट नकार केंद्रीय सरकारने कळविला आहे तसेच संघटनरमार्फत करण्यात आलेल्या निवेदनांची दखल शासन घेईल अशी त्यांना अपेक्षा आहे.
सातवा वेतन आयोगाची तफावत आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी बाबत प्रस्ताव केंद्र शासनाला कामगार युनियन मार्फत सादर करण्यात आलेले आहेत. तसेच आठव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 3.68% म्हणजेच 44.44% वेतन वाढ होणार आहे. 8th pay commission salary increase calculator नुसार पगारामध्ये 3.68% वाढ लागू होऊ शकते.
आतापर्यंत वेतन आयोगाने पुढील प्रमाणे (Fitment factor) फिटमेंट फॅक्टर नुसार पेमेंट वाढले आहे:-
4th Pay Commission ने वाढला पगार
- पगार वाढ : 27.6%
- किमान वेतनस्केल : रु.750
5th Pay Commission ने वाढलेला पगार
- पगारवाढ : 31%
- किमान वेतन स्केल : रु. 2,550
6th Pay Commission ने वाढलेला पगार
- फिटमेंट फॅक्टर : 1.86 पट
- पगार वाढ: 54%
- किमान वेतन स्केल :रु. 7,000
7th Pay Commission ने वाढलेला पगार
- फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
- पगारवाढ: 14.29%
- किमान वेतन स्केल : रु. 18,000
Latest Update: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणेच 60 वर्ष होणार! Retiredment Age 60 year Update
salary after 8th pay commission:-
सूत्रांच्या माहितीनुसार जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर पुढील प्रमाणे वेतन वाढ होणे अपेक्षित आहे.
8th Pay Commission ने किती वाढेल पगार
- फिटमेंट फॅक्टर : 3.68 पट वाढणे अपेक्षित
- वाढ : 44.44%
- किमान वेतनमान: रु. 26000 /- वाढणे अपेक्षित
सध्या तरी 8 वा वेतन आयोग बाबत कोणताही प्रस्ताव नाही आहे . पन लवकरच यावर निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना सध्या 14.29% पगार वाढ करण्यात आलेली होती. तर आठव्या वेतन आयोगामध्ये आतापर्यंतच्या नियमानुसार तसेच संघटनेच्या प्रस्तावानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 3.68 पट म्हणजे 44.44% वेतन वाढ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट शासन निर्णय करिता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment